दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या, या तारखेपासून सुरू होणार परिक्षा,वेळापत्रक जाहीर….

0

महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी, 12 वी परीक्षा 2025:दहावी आणि बारावी च्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
१२ वी ची परीक्षा 11 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात होणार आहे.
१० वी ची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च या काळात होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ तर्फे वेळापत्रक जाहीर..

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2024 ची तारीख जाहीर झाली आहे. सामान्यत: महाराष्ट्र एचएससी बोर्डाच्या परीक्षा तिसऱ्या आठवड्यात आणि एसएससी बोर्डाच्या परीक्षा मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होतात, परंतु यावेळी बोर्डाच्या परीक्षा 2025 आठ ते 10 दिवस आधी घेतल्या जात आहेत.महाराष्ट्र बोर्ड 10वी आणि 12वीचे विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन MSBSHSE बोर्ड परीक्षा 2025 च्या तारखेबद्दल माहिती मिळवू शकतात.

महाराष्ट्र बोर्ड परीक्षा 2025 सुमारे दोन महिने चालणार आहे. बोर्डातर्फे प्रथम प्रात्यक्षिक परीक्षा, त्यानंतर लेखी परीक्षांचे आयोजन केले जाईल. महाराष्ट्र बोर्डाच्या प्रात्यक्षिक, तोंडी, अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 24 जानेवारी ते 10 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होतील. फेब्रुवारी महिन्यात थिअरी परीक्षा घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र बोर्ड MSBSHSE इयत्ता 10 वी बोर्ड परीक्षा 2025 म्हणजेच माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीत घेण्यात येईल. महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 10 वी प्रात्यक्षिक आणि अंतर्गत सहाय्यक परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत होणार आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »