मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असोसिएशन ने दिले पश्चिम बंगाल सरकार पत्र : आर. जी कर मेडिकल कॉलेज पश्चिम बंगाल कोलकाता केस

पत्रकार उत्तम आवारे : मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असोसिएशन ही एक डॉक्टर विद्यार्थी ची असोसिएशन आहे आर. जी कर मेडिकल कॉलेज पश्चिम बंगाल कोलकाता येथील महिला डॉक्टर सोबत झालेल्या अमानवी क्रूर हत्येचा लवकरात लवकर तपास करून नाराधमास जलद गती न्यायालयात हजर करून कठोर शिक्षा द्यावी तसेच ईतर मागणी करण्यातसाठी  पश्चिम बंगाल सरकार  पत्र दिले ते पुढीप्रमाणे :

आर. जी कर मेडिकल कॉलेज पश्चिम बंगाल कोलकाता येथील महिला डॉक्टर सोबत झालेल्या अमानवी, क्रूर हत्येचा देशातील सर्व डॉक्टर्स ना विचलित करणारी घटना घडली.आमच्या महिला डॉक्टर भगिनी सोबत आधी बलात्कार आणि नंतर हत्या करून आरोपी अजूनही निसुर आहे .आमची सरकारला ,राज्यकर्त्यांना विचारणा आहे की,अजून किती दिवस डॉक्टर्स,नर्सेस,पॅरामेडिकल स्टाफ ह्यावर भ्याड हल्ले,हत्या चालणार आहेत.ह्या प्रकरणातून देशातील डॉक्टर्स बद्दलची संरक्षणाच्या जबाबदारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आर. जी कर मेडिकल कॉलेज मधील सर्व डॉक्टर्स बंधू भगिनी सोबत आम्ही उभे आहोत.
आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर असोसिएशन ने केल्या गेलेल्या सर्व मागण्यासाठी आम्ही पाठिंबा देत आहोत .
आमच्या मागण्या पुढील प्रमाणे.
१- तात्काळ असे दुष्कर्म केलेल्या नाराधमास जलद गती न्यायालयात हजर करून कठोर शिक्षा द्यावी
२- आरोपीस फाशीची च शिक्षा देण्यासाठी प्रयत्नशील रहावे जेणेकरून महिला डॉक्टर्स नव्हे तर देशातील कोणतीच भगिनी अश्या संकटात अडकु नये.आणि ह्यावर आळा बसेल.
३- देशात सुरू असलेल्या डॉक्टर्स वरील भ्याड,निर्दयी हल्ल्याच्या विरोधात सक्षम कायदा तात्काळ पारित करावा.
४- सेंट्रल हेल्थकेअर प्रोटेक्शन कायदा लागू करण्यात यावा.यासाठी मेडिकल असोसिएशन आणि कम्युनिटी एक्स्पर्ट कमिटी तात्काळ गठित करण्यात यावी.
५- सदरील घटनेचा विरोध करीत असलेल्या आर. जी कर मेडिकल कॉलेज चा सर्व वैद्यकीय विद्यार्थी,डॉक्टर्स ह्यांना प्रशासन आणि पोलिस ह्यांच्याकडून कोणताही दुर्व्यव्यवहार होणार नाही ह्याची दक्षता घेण्यात यावी.आंदोलने ही कायदेशीर आणि शांतीपूर्वक आहेत त्याचा योग्य सन्मान देखील झाला पाहिजे.
अश्या हृदयद्रावक हल्ल्यात मृत झालेल्या आमच्या डॉक्टर भगिनी ह्यांना आमच्या महाराष्ट्र मेडिकल स्टूडेंट वेल्फेअर असो. कडून भावपूर्ण श्रद्धांजली 🙏🏻

डॉक्टर विद्यार्थी व शिक्षक काय म्हणतात?

आज अश्या अमानवी, राक्षकी वृत्तीस आळा बसवण्याचे काम देश चालवणाऱ्यांचे आहे.अतिशय मनास वेदना देणारी घटना घडली असुन आरोपीस तात्काळ फाशीची च शिक्षा देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.सदरील घटनेस दाबण्याचे काम जे कोणी करत असतील त्यांना सुधा आरोपी म्हणून घोषित करावे.आया-बहिणी जर सुरक्षित नसतील तर स्वातंत्र्य मिळाल्याचे नगाडे वाजविण्यात अर्थच नाही.
डॉ.अक्षय वाळुंज पाटील.
प्रदेश सचिव मेडिकल स्टूडेंट वेलफेअर असोसिएशन (महाराष्ट्र राज्य)

आरोपीस कोणत्याही प्रकारची जात,धर्म नसतो.त्यामुळे त्यास पाठीशी घालण्याचे पाप कोणीही करू नये.आमच्या भगिनीचा जो अपमान आणि हत्या केली गेली ती घटना प्रत्येक भारतीयास लज्जास्पद आहे.तात्काळ फाशी ची शिक्षा देण्यास प्राधान्य द्यावे .
डॉ.यशराज काटकर.
अध्यक्ष.
मेडिकल स्टूडेंट वेलफेअर असोसिएशन.

डॉक्टर भगिनी असो किंवा इतर क्षेत्रातील भगिनी..गुन्हा हा एका महिलेवर झालेला आहे.अश्या अमानवी आणि हृदयद्रावक घटनेचा जाहीर निषेध करतो.शोकांतिका आहे की वैद्यकीय क्षेत्रातील लोक फक्त ह्या घटनेवर भाष्य करीत आहेत.बाकी देशातील लोकांचे मौन वेदनादायक आहेच.आरोपीस जलद गती न्यायालयात फाशीची च शिक्षा सुनावण्यात यावी.आणि वैद्कीय क्षेत्रातील सुरक्षेच्या कायद्यावर तात्काळ समिती गठित करून कायदा पारित करावा.
डॉ.निलेश जाधव.
अध्यक्ष

पत्र:

पत्रकार -

Translate »