RRC Recruitment 2024 : रेल्वेत महाभरती! ३ हजारहून अधिक पदांसाठी भरती,जाणून घ्या कसा करायचा अर्ज…

0

उत्तर रेल्वेच्या भरतीची घोषणा झाली आहे! उद्यापासून ३००० हून अधिक प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. रेल्वेच्या विविध विभागात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. शिकाऊ कायदा १९६१ अंतर्गत ही भरती होत असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख १६ सप्टेंबर आहे.


पदे: शिकाऊ पदांसाठी 4095 जागा उपलब्ध आहेत.
अर्ज करण्याची मुदत: 16 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर 2024

या भरतीसाठी उमेदवारांना १०० रुपये शुल्क द्यावे लागेल. मात्र, एससी (SC), एसटी (ST), ईडब्ल्यूएस (EWS), पीडब्ल्यूडी (PWD) आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यातून सूट देण्यात आली आहे.

या भरतीची अधिकृत अधिसूचना १३ ऑगस्टला प्रसिद्ध झाली आहे. तुम्ही सर्व आवश्यक माहितीसाठी अधिसूचना डाउनलोड करून काळजीपूर्वक वाचू शकता.

अर्ज कसा करायचा?

उत्तर रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करा. सर्व माहिती भरून, कागदपत्रे अपलोड करून आणि शुल्क भरून अर्ज सबमिट करा.

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी तुम्ही १०वी आणि आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तुम्हाला किमान ५०% गुण मिळाले असले पाहिजेत.

वयोमर्यादा

अर्जदारांचे वय १५ ते २४ वर्षांच्या दरम्यान असावे.

शिकाऊ पदांसाठीची अधिसूचना १३ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तुम्ही सर्व आवश्यक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करू शकता:

https://www.rrcnr.org/rrcnr_pdf/Act_Apprentice_2024.pdf


अर्ज करण्याची अधिकृत website 👇👇
https://www.rrcnr.org

अर्ज कसा करायचा:

१. सर्वप्रथम, तुम्हाला रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या (RRC NR)  अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
२. होमपेजवर तुम्हाला ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
३. सर्व माहिती काळजीपूर्वक भरून टाका आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
४. शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
५. अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »