दिघवद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिक्षकांनी साकार केला दुर्मिळ नाण्यांचा प्रकल्प
![](https://krushinews.com/wp-content/uploads/2024/08/IMG-20240818-WA0015-726x1024.jpg)
कैलास सोनवणे :दिघवद विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून शिक्षकांनी साकार केला दुर्मिळ नाण्यांचा प्रकल्प
इतिहासाच्या अभ्यासाचे महत्वाचे विश्वसनीय साधन म्हणून नाण्यांकडे बघितलं जातं.इतिहासाच्या संशोधनासाठी आणि अभ्यासासाठी नाण्यांना अतिशय महत्त्व आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूतीतून नाण्यांचा इतिहास कळावा या उद्देशाने श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलित, स्वामी विवेकानंद विद्यालय दिघवद विद्यालयातील इतिहास विषयाचे शिक्षक एस.जी. गांगुर्डे यांनी नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने दुर्मिळ नाण्यांच संकलन केलं आणि ह्या प्रत्येक नाण्याची कालखंडानुसार विभागणी करून नाण्यांची प्राथमिक माहिती मिळवून त्याची नोंद केली. विद्यार्थ्यांनी सुद्धा या उपक्रमामध्ये अतिशय उत्स्फूर्त उत्साह दाखवून नाणी गोळा केली. ह्या नाण्यांमध्ये अगदी स्वातंत्र्यपूर्व कालखंडातील म्हणजे ब्रिटिशकालीन नाणी मिळून आली. 1910 ते 2020 पर्यंतची अनेक दुर्मिळ नाणी या प्रकल्पात आहे. कालखंडानुसार चलन व्यवस्थेमध्ये कसा बदल झाला तसेच बदलत्या परिस्थितीनुसार नाण्यांच्या आकारमानामध्ये झालेला बदल नाणी बनविताना वापरलेला धातू नाण्यांवरती असणाऱ्या राजांच्या, देव देवतांच्या, समाज सुधारकांच्या प्रतिमा यावरून तत्कालीन सामाजिक, राजकीय, धार्मिक परिस्थितीचा बोध होण्यास विद्यार्थ्यांना मदत मिळते. पाचवीपासून ते दहावीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूतीतून नाण्यांच अध्ययन करण्यासाठी हा प्रकल्प मार्गदर्शक ठरणार आहे.
ह्या प्रकल्पाबद्दल संस्थेचे अध्यक्ष-बाळासाहेब रसाळ, चिटणीस-अण्णासाहेब गांगुर्डे,शाळा समिती अध्यक्ष-साहेबराव गांगुर्डे,संचालक-सदाशिव गांगुर्डे, विठ्ठल गांगुर्डे,दत्तात्रय गांगुर्डे, नानासाहेब गांगुर्डे,बनुबाई गागरे व इतर सर्व संचालक व सभासद यांनी कौतुक केले व शाळेची तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी राबविल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांचा आढावा घेतला.
या प्रकल्पासाठी शाळेचे मुख्याध्यापक टी.एम. पेंढारी ,पर्यवेक्षक एस.जी सोनवणे तसेच के.पी.गांगुर्डे ऐ.पी.गांगुर्डे,पाटील एस.व्ही. पेंढारी,पी.डी.,एस.बी.पाटील, डी.के.गांगुर्डे,जी.के.गांगुर्डे, ए.आर.ठोंबरे,सुधीर ठाकरे एम.के.गोसावी एस.एन.गांगुर्डे,ओ.आर.गांगुर्डे एस.एम.घोलप श्रीमती कानडे मॅडम,राठोड एस.बी., साबळे के.ओ.ह्या सर्वांचे सहकार्य लाभले.