Police Recruitment 2024 : राज्यात साडेसात हजार पदांसाठी डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती..

डिसेंबर महिन्यात पुन्हा पोलिस भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात तब्बल साडेसात तर मुंबईसाठी १२०० पोलिसांची पदे भरती जाणार आहे.

राज्यात पोलिस दलाची संख्या वाढविण्याच्या दृष्टीने मोठे प्रयत्न सुरू आहेत.२०२२ पासून सुरू झालेल्या भरती प्रक्रियेतून अनेक पदे भरण्यात आली आहेत.राज्य सरकारने २०२२ मध्ये पोलिस भरतीची घोषणा केली होती. त्यानंतर २०२३ मध्ये राज्यातील पोलिस दलात मोठ्या प्रमाणात भरती करण्यात आली. मात्र, कोरोना महामारी आणि अनेक जणांच्या निवृत्तीमुळे पोलिस दलात मोठी पदे रिक्त राहिली होती. या पार्श्वभूमीवर, सरकारने डिसेंबरमध्ये साडेसात हजार नवीन पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यात मुंबईसाठी १२०० पदे समाविष्ट आहेत.

राज्यातील २५ जिल्ह्यांत पोलीस शिपाई, आठ जिल्ह्यांत चालक शिपाई आणि पाच जिल्ह्यांत बॅण्डसमॅनच्या लेखी परीक्षा घेण्यात आल्या आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये सप्टेंबरपर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या भरतीनंतर राज्यात नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे. मुंबईतही पोलिसांची संख्या वाढविण्यासाठी १२०० नवीन पदांची भरती करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई शहराला अधिक सुरक्षित बनविण्यात मदत होईल.

पत्रकार -

Translate »