Cloudy Weather : जुन्नरच्या पूर्व भागात ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा

0

Cloudy Weather : जुन्नरच्या पूर्व भागात ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर करपा

कांद्याला बाजारभाव नसल्याने अडचणीत असताना अचानक ढगाळ वातावरण होऊन दमट हवामान निर्माण झाल्याने अवकाळी पाऊसदेखील पडत असल्याने शेतकरी चिंतित झालेला आहे.
Onion Market Update आळेफाटा ः जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील आळेफाटा, राजुरी, आळे, वडगाव आनंद, बोरी बुद्रुक, माळवाडी, जाधववाडी, वडगाव कांदळी, भोरवाडी, उंचखडक या गावांतील शेतकरी कांदा पिकाला (Onion Crop) फवारणी करताना दिसून येत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणातील ढगाळ हवामानाचा (Cloudy Weather) कांदा पिकावर मोठ्या प्रमाणावर करपा रोगाचा (Onion Disease) प्रादुर्भाव होताना दिसत असल्याने या परीसरातील शेतकऱ्यांना पिकांचे संरक्षण करण्यासाठी हजारो रुपयांची औषध फवारणी करावी लागत आहे.
या रोगामुळे कांद्याच्या पिकाचे शेंडे सुकून गेलेली दिसून येत आहे. त्यातच कांद्याला बाजारभाव नसल्याने अडचणीत असताना अचानक ढगाळ वातावरण होऊन दमट हवामान निर्माण झाल्याने अवकाळी पाऊसदेखील पडत असल्याने शेतकरी चिंतित झालेला आहे.
कांदा उत्पादक शेतकरी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून वातावरणात ढगाळ वातावरण झाल्याने कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भावामुळे पिके वाळून गेली असल्याने औषधांची फवारणी करावी लागत आहे व यामुळे औषधांच्या खर्चात वाढ होणार, असल्याचे शेतकरी संतोष कणसे यांनी सांगितले.
धन्यवाद
🙏🙏🙏

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »