पनीर खाताय तर सावधान ! आधी हे वाचा…पनीरच्या नावाखाली बनावट पनीर
पनीर हा आपल्या आवडीचा पदार्थ असला तरी, बाजारात मिळणाऱ्या पनीरची गुणवत्ता नेहमीच विश्वासार्ह असते असे नाही. घरगुती पद्धतीने बनवलेला पनीर तुलनेने अधिक शुद्ध आणि पौष्टिक असतो. दूध आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांमध्ये भेसळ होत असल्याची प्रकरणे समोर येत आहेत. विशेषत: सण आला की भेसळीचा हा खेळ अधिकच वाढतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी ते अतिरिक्त पैसे कमविण्याचे साधन बनते.तुम्ही पनीरची भाजी किंवा पनीरशी संबंधित खाद्य पदार्थ खात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.तुम्ही हॉटेलमध्ये पनीरची भाजी खात असाल तर सावध राहा हॉटेलमध्ये बनावट पनीर विकले जात आहे.पनीर हे भेसळ असल्याचा आणि मानवी शरीरास घातक आहे.पनीर हे शुद्ध दूध नासवून केले जाते. त्यामुळे दोन लिटर दूधापासून जेमतेम पाव किलो पनीर मिळू शकते. चीज अॅनालॉगमध्ये दुधाची पावडर आणि वनस्पती तेलाचा वापर करण्यात येतो.
पण बाजारातून पनीर खरेदी करताना आपण कशी ओळखू शकतो की ते शुद्ध आहे? यासाठी काही सोप्या पद्धती आहेत.कसं ओळखाल बनावट पनीर?
घरगुती स्वरूपामध्ये उत्तम दर्जाच्या पनीरची चाचणी करायची असल्यास एक बारीक सुई घेऊन पनीरमध्ये खुपसून पहा. पनीरमध्ये घालून पाहिल्यास ते सुईला चिकटत नाही.जर सुई चिकटली तर समजून घ्या की या पनीरमध्ये वनस्पती तेलासारखे कृत्रिम घटक मिसळलेले आहेत.
पनीरचा छोटा तुकडा घेऊन तो गरम तव्यावर काही मिनिटांसाठी ठेवून द्या. पनीर जर शुद्ध असेल तर ते गरम होऊन त्यातील जास्तीचे पाणी बाहेर टाकेल. त्याचबरोबर त्या तुकड्याचा शेप न बिघडता तो आहे तसाच राहील.भेसळयुक्त पनीरच्या तुकड्याचा शेप बिघडेल व ते कोरडे पडेल.
बाजारातून आणलेले पनीर एका प्लेटमध्ये काढा. अगदी हलके दाब देऊन हाताने मॅश करा किंवा मळून बघा. जर ते वेगळे झाले तर याचा अर्थ त्यात भेसळ नाही. पण तसे न झाल्यास त्यात भेसळ असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक, भेसळयुक्त पनीरमध्ये जे घटक टाकले जातात ते दुधाचे गुणधर्म कमी करतात आणि त्यामुळे अशा पनीरचा दाबल्यावर चुरा होत नाही. त्यामुळे तुम्ही बाजारात केव्हाही पनीर खरेदीला जाल तेव्हा प्रथम ते हाताने मळून बघा.
बनावटी पनीर स्किम्ड मिल्क पावडरपासून बनवलेले असते. त्यामुळे ते हाताचा दबाव सहन करु शकत नाही. मळल्याने पनीरचे तुकडे होऊन ते विखूरते. जर तुम्ही पनीर हातांनी मळल्याने तुटून विखरत असेल तर समजावे की ते बनावटी आहे.
पनीरचा थोडासा भाग घ्या आणि सुमारे 5 मिनिटे पाण्यात उकळा. प्लेटमध्ये काढल्यानंतर थंड होऊ द्या. यानंतर त्यावर आयोडीन टिंचरचे काही थेंब टाका. जर पनीरचां रंग निळा झाला तर याचा अर्थ असा होतो की ते दुधात कृत्रिम घटक मिसळून पनीर बनवले गेले आहे.