Rain Alert : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता..
कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पोषक हवामान झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या मते, राज्यात पावसाचे प्रमाण वाढणार आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उर्वरित राज्यातही तुरळक पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे.हवामान खात्याने (IMD) महाराष्ट्र, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, आसाम, गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये 23 ते 25 ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा इशारा जारी केला आहे.
अरबी समुद्र आणि बांगलादेशात तयार झालेली कमी दाबाची क्षेत्रे ही राज्यात पावसाचे प्रमुख कारण आहेत. आज (ता. २३) कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.उत्तर बांगलादेश आणि अरबी समुद्रातील कमी दाबाची क्षेत्रे पश्चिम बंगाल आणि उत्तरेकडे सरकत आहेत.उत्तर बांगलादेशावरील कमी दाबाच्या क्षेत्राच्या केंद्रातून पूर्व-आग्नेय दिशेने बंगालच्या उपसागराकडे सरकत आहे. 24 ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागरात आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.