Nashik: गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ..
गेल्या तीन ते चार दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत आहे.गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.पूर आल्याने लहान मंदिरे पाण्याखाली गेले आहे गोदा काठावरील मंदिरांना पाण्याचा वेढा बसला आहे. त्यामुळे . दुतोंडया मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहोचले असून अनेक छोटी मंदिरे पाण्याखाली गेले आहेत. गंगापूर धरण 93.4 टक्के भरले आहे. जर दोन दिवस पाऊस असाच सुरू राहिला तर कोणत्याही क्षणी धरण भरण्याची शक्यता आहे. परिणामी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येत आहे. गंगापूर धरणातून सकाळपासून टप्याटप्याने गोदावरी नदीत विसर्गात वाढ केली जात आहे.
कालही गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल सकाळी 8 वाजता 520 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला. तर दुपारी एक वाजेपासून 2 हजार 382 क्यूसेक वेगाने विसर्ग सुरु करण्यात आला आहे. आजही धरणातून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पाण्याची पातळी वाढत असल्याने नागरिकांनी जीव धोक्यात घालन पर्यटन करू नये याची काळजी घेणे गरजेचे आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरु टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ होण्याची शक्यत पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेच प्रशासनाकडून देण्यात आला आहे.हवामान विभागाने मंगळवार २७ ऑगस्ट पर्यंत जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आणखी दोन दिवस जिल्ह्यात पाऊस असणार आहे.