मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थ्यांची होळकर नगरी चांदवड होळकर वाडा येथे भेट.

0

मातोश्रींच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील विद्यार्थ्यांची होळकर नगरी चांदवड होळकर वाडा येथे भेट.

कैलास सोनवणे: संपूर्ण भारतभर हे वर्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे ती शताब्दी वर्ष म्हणून साजरी करत आहोत त्यानिमित्त भोसला मिलिटरी स्कूल नाशिक येथील इयत्ता नववीचे विद्यार्थी मातोश्रींच्या कार्याचा उजळा होण्यासाठी आणि मातोश्री ने केलेल्या कार्य आपल्या अंगी सात करण्यासाठी होळकर नगरी चांदवड या ठिकाणी येऊन होळकर वाडा रंग महाल या ठिकाणी सहल नियोजित केली होती. तसेच रेणुका देवी मंदिर याही ठिकाणी भेट देण्यात आली.
होळकर वाडा हा चांदवड नगरीचा मानाचा तुरा म्हणून ओळखला जातो आणि या पुरातत्व वास्तूचा उल्लेख संपूर्ण भारतभर केला जातो या ठिकाणी मातोश्रींनी होळकरांची उपराजधानी म्हणून या चांदवड नगरीला स्थान होते. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात या वास्तु बघण्यासाठी भारतभरातून पर्यटक येतात हे वर्ष त्रिशताब्दी वर्ष म्हणून सर्वजण वर्षभर साजरे करत आहे यानिमित्तानेच भोसला मिलिटरी स्कूल येथील मुलं आणि मुली यांनी या ठिकाणी भेट दिली. रंगमालात आल्यानंतर या ठिकाणी होळकर नगरीचा इतिहास मुलांना समजावण्यात आला. रंगमालाचे रुपडे आता कुठे मागील दोन वर्षापासून बदलत आहे रंगमालाचे नूतनीकरणाचे काम आजही चालू आहे. या होळकर नगरीचा इतिहास जाणून घेतल्यानंतर शिक्षक वृंद हा इतिहास जाणून घेतल्यानंतर आनंदित झाले. तसेच विद्यार्थी याप्रसंगी हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव सोहळा समिती नाशिक महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री समाधान भाऊ बागल यांनी या मुलांना चांदवड होळकर नगरीचा इतिहास सांगितला आणि मातोश्रींच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. तसेच बाळाभाऊ पाडवी यांनी या रंगमालाच्या कार्याबद्दल माहिती सांगितली. या ठिकाणी अशोक काका व्यवहारे, गुड्डू भाऊ खैरनार, तसेच काही समाजसेवक उपस्थित होते. भोसला मिलिटरी स्कूल यांच्यातर्फे समाधान भाऊ बागल सुपरवायझर प्रियांका भट यांनी एक वृक्ष देऊन त्यांनी केलेल्या मातोश्री च्या कामाचा व परमिशन मिळून दिल्या बद्दल याबद्दल गौरव करण्यात आला. अनिता हिरे, मनीषा पेंढारकर,कमल महाजन सागर उदावंत, भोसला मिलिटरी स्कूल येथून उपस्थित होते तसेच ट्रस्टचा सुभाष भाऊ पवार यांचा वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. रेणुका माता मंदिरात जाऊन मुलांनी वनभोजन केले.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Translate »