आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा – महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक / प्राचार्यांची आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी घेतली बैठक

0



कैलास सोनवणे: बदलापूर येथे अल्पवयीन मुलींवर शाळेत अत्याचार झाल्याच्या पार्श्वभूमीवर आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी आज कोपरगाव येथे तालुक्यातील शाळा – महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक / प्राचार्यांची बैठक घेतली. यावेळी शाळा / महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाय योजनांबद्दल माहिती देण्यात आली तसेच शाळा व महाविद्यालयांना येत असलेल्या अडचणी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी समजून घेतल्या व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना दिल्या. तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या संपर्क कार्यालयातील हेल्पलाईन क्रमांक 9858550333 सर्व शाळा / महाविद्यालयातील विद्यार्थिनींना देण्यात येणार असुन त्याद्वारे विद्यार्थिनींना आवश्यक मदत वेळेवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक भगवानजी माथुरे, कोपरगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजेंद्रजी महाजन, नायब तहसीलदार प्रफुल्लिताताई सातपुते, पंचायत समिती महिला व बालकल्याण अधिकारी पंडितराव वाघिरे, गटशिक्षण अधिकारी शबानाताई शेख, रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य कारभारीनाना आगवण, पद्माकांतजी कुदळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव चव्हाण, संचालक सुधाकरराव रोहोम, दिलीपजी बोरनारे, सचिनजी चांदगुडे, माजी संचालक बाळासाहेबजी बारहाते, नंदकिशोरजी औताडे, राजेंद्रजी औताडे, ज्ञानेश्वरजी गव्हाणे, तालुक्यातील शाळा – महाविद्यालयांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक / प्राचार्य आदी उपस्थित होते.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »