नाशिक त्रयंबकेश्वर: कुंभमेळा शाहीस्नानाच्या तारखा जाहिर
कैलास सोनवणे(पत्रकार कृषी न्युज):कुंभमेळा शाहीस्नानाच्या तारखा जाहिर
३१ आँक्टोबर . २०२६ ला ध्वजारोहन तर २४ जुलै २०२८ ला ध्वजावतरण
आगामी कुंभमेळ्याची घोषणा करण्यात आल्यामुळे त्र्यंबक नगरीमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
३१ आँक्टोबर.२०२६ रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहन होईल
—————————————————
प्रथम शाहीस्नान, आषाढ वद्य अमावस्या, सोमवार, दि. २ आगस्ट २०२७ रोजी.
—————————————————
द्वितिय शाहीस्नान, श्रावण वद्य अमावस्या, मंगळवार, दि. ३१ आगस्ट २०२७ रोजी.
—————————————————
तृतीय शाहीस्नान, भाद्रपद शुध्द द्वादशी, रविवार, दि. १२ सप्टेबर २०२७ रोजी संपन्न होईल.
—————————————————
श्रावण शुध्द तृतीया, सोमवार, दि. २४ जुलै २०२८ रोजी कुंभमेळा समाप्ती अर्थात कुंभमेळा ध्वजावतरण संपन्न होईल.
—————————————————
याप्रमाणे आज तारखांची घोषणा करण्यात आली. गुरुपुष्यामृत मुहुर्ताचं औचित्य साधुन षड् दर्शन आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत सागरानंद सरस्वती महाराज, श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे मुख्य संरक्षक श्री हरिगिरीजी महाराज, महामण्डलेश्वर शिवगिरीजी महाराज, आनंद आखाड्याचे श्रीमहंत शंकरानंद सरस्वती महाराज, श्रीमहंत गणेशानंद सरस्वती महाराज, साध्वी शैलजा माता आदिंसह अनेक साधुसंतांनी कुशावर्त तिर्थामध्ये स्नान करुन भगवान त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी विविध आखाड्यांचे वंशपरंपरागत ऊपाध्ये वेदमुर्ती त्रिविक्रम जोशी, वेदमुर्ती प्रमोद जोशी, जयंत शिखरे, पंकज धारणे उपस्थित होते. यानंतर उपस्थित साधुमहंत तसेच नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर, मुख्याधिकारी संजय जाधव आदींच्या हस्ते कुशावर्त तिर्थावर गंगापुजन करण्यात आले. श्रीगंगामातेला साडीचोळी अर्पण करण्यात आली. यानंतर कुशावर्त चौकामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कुंभमेळा तारखांची घोषणा करण्यात आली.