मंगळवारचा (आजचा) सूर्योदय येवल्यासाठी घेऊन येणार सुवर्ण सकाळ

0

कैलास सोनवणे: “मंगळवारचा सूर्योदय येवल्यासाठी घेऊन येणार सुवर्ण सकाळ”

राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा येवला विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते मा ना छगनरावजी भुजबळ यांनी सुमारे २० वर्षापूर्वी येवलेकरांना दाखवलेलं स्वप्न सत्यात उतरणार आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सुरू केलेल्या अविरत परिश्रमानंतर गुजरातला वाहून जाणारे पाणी येवल्यातील बळीराजाच्या शेतात खळाळनार आहे. तीन पिढ्यांनी पाहिलेलं पाट पाण्याचं स्वप्न उद्या दि.२७ ऑगस्ट २०२४ रोजी पहाटे येवला तालुक्याच्या प्रवेशद्वारावर धडक देणार आहे. भुजबळ साहेबांच्या रूपाने येवल्याला जलसंजिवणी अर्पण करणाऱ्या “आधुनिक भगिरथाला” धन्यवाद देण्यासाठी कातरणी ता येवला येथे सकाळी ठीक ८.०० राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मा श्री दिलीप अण्णा खैरे, ज्येष्ठ नेते मा श्री अंबादास बनकर अण्णा , विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष श्री वसंतराव पवार,तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे, पाणी आंदोलक मोहन शेलार,माजी जी प अध्यक्ष राधा किसन सोनवणे,माजी सभापती किसनराव धनगे, बाळासाहेब गुंड,नवनाथ काळे,गणपत राव कांदळकर, ज्ञानेश्वर दराडे,माजी नगराध्यक्ष हुसेन शेख,भाऊसाहेब भवर, सचिन दरेकर,सोहेल मोमीन,प्रकाश वाघ,मायावती पगारे,मच्छिंद्र थोरात,बाळासाहेब पिंपरकर , एल जी कदम, पुंडलिक होंडे,तुळशीराम कोकाटे,दीपक लोणारी,दीपक गायकवाड आदींसह मतदारसंघातील हजारो पदाधिकारी,कार्यकर्ते,शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात येणार आहे.

तरी सर्वांनी उद्या सकाळी ठीक ८.०० वाजता कातरणी ता येवला येथे उपस्थित राहावे ही विनंती.

वेळ. स.८.००वा
ठिकाण – कातरनी ता.येवला

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »