सतत थकवा येतो?शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे…..?
रक्ताची कमतरता शरीरात कोणत्याही वयात उद्भवू शकते. शरीरात रक्ताची कमतरता होण्याच्या स्थितीला एनिमिया असं म्हणतात. एनिमिया झाल्यानंतर थकवा येणं, कमकुवतपणा, डोकेदुखी अशी लक्षणं जाणवतात. छातीत उजव्या बाजूला दुखणं, केस आणि नखं खराब होणं, ताप येणं, पोलिओ अशी गंभीर लक्षणं दिसून येतात. (बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते.
शरीरात रक्ताची कमतरता भासू नये यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होईल.
◼️मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.
◼️आहारात सिझनल फळांचा समावेश करा.आंबट फळांचे नियमित सेवन केल्यास चेहऱ्यावर तेज येते तसेच रक्त स्वच्छ होते.गाजर खाल्ल्यास शरीरातील रक्त वाढते तसेच यात लोहाचे प्रमाणही मुबलक असते.
◼️गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,
◼️राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.
◼️सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे
◼️सुकामेवा शेंगदाणे खावे,
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा.
◼️शेवग्याच्या पानांचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास आयर्न, व्हिटामीन ए, सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात मिळते. रोज सकाळी रिकाम्या पोटी तूप किंवा मधासह १ चमचा मोरींगा पावडर घ्या. रक्ताची कमतरता दूर करण्यास हा प्रभावी उपाय आहे.
◼️खजूर, अंजीर आणि मनूके या तिन्ही पदार्थांमध्ये आयर्न, मॅग्नेशियम, कॉपर आणि व्हिटामीन ए, सी मोठ्या प्रमाणात असते. नाश्त्याला रात्री पाण्यात भिजवलेले खजूर, २ अंजीर आणि एक मोठा चमचाभर मनूके खा. ज्यामुळे तुम्हाला उर्जा मिळेल आणि आयर्नचे प्रमाण वाढेल.
◼️पालेभाज्यांमध्ये पालक ही अत्यंत गुणकारी असून पालक खाणे हा शरीरातील रक्त वाढीसाठी एक अत्यंत योग्य उपाय होऊ शकतो. पालक मध्ये व्हिटॅमिन सी, बी ९, ए, आयर्न आणि फायबर चे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे पालक खाल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढते.