सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला; 8 महिन्यांपूर्वी झालं होतं लोकार्पण
सिंधुदुर्गामधील राजकोट या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा 32 फूट उंच पुतळा कोसळला आहे.अवघ्या 8 महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुतळ्याचे अनावरण केले होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबाबतचा भारतीय नौदलाचा दावा:
भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेबद्दल जे निवेदन जारी केले आहे, त्यावरून काही महत्त्वाच्या मुद्दे समोर आले आहे..
नौदलने स्पष्ट केले आहे की, ते या दुर्घटनेचे कारण शोधण्यासाठी तज्ज्ञांच्या मदतीने प्रयत्नशील आहे.नौदलाने पुतळ्याची दुरुस्ती करून तो पुन्हा राजकोट किल्ल्यावर लावण्याचे आश्वासन दिले आहे.राज्य सरकारने या पुतळ्याचे उभारणीचे काम भारतीय नौदलाकडे सोपवले होते, असे स्पष्ट केले आहे. या दुर्घटनेमुळे राज्यात मोठा संताप व्यक्त होत आहे.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेनंतर राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पुतळ्याची उभारणी करणाऱ्या आणि देखरेख करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल केला आहे.राज्य सरकार आणि भारतीय नौदल यांच्यात या पुतळ्याची जबाबदारी कोणत्याची, याबाबत खीचाखी सुरू आहे.
पुतळ्याची उभारणी आणि देखरेख करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करून सरकारने आपले पक्ष काढण्याचा प्रयत्न केला आहे.