Indian Bank : नोकरी करणाऱ्यांसाठी आता सुवर्ण संधी!  इंडियन बँकेत ३०० पदांसाठी भरती; जाणून घ्या कसा करायचा अर्ज ..

0

इंडियन बँकेत विविध पदांसाठी ३०० जागांची भरती निघाली आहे.१३ तारखेपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तुम्ही बँकेत नोकरी मिळवण्याची इच्छा असेल आणि बँकेत नोकरी शोधत असाल, तर तुम्ही इंडियन बँकेत या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता.

जाणून घ्या प्रक्रियेबद्दल माहिती आणि अर्ज करण्याची प्रक्रिया-

अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २ सप्टेंबर २०२४ आहे.भरती प्रक्रिया एकून ३०० पदांसाठी सुरू आहे. अर्ज करण्यासाठी तुम्हाला इंडियन बँकेच्या अधिकृत वेबसाइट, indianbank.in ला भेट द्या.अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.उमेदवाराचे वय २० ते ३० वयोगटात असणे गरजेचे आहे .भरती साठी उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे. त्यानंतर मुलाखत होईल आणि मग उमेदवाराची निवड केली जाणार आहे.अर्ज करणाऱ्या साठी १००० रुपये फी लागेल. आरक्षित श्रेणीमध्ये येणाऱ्यांना १७५ रुपये फी लागेल.

अर्ज करण्यासाठी, प्रथम या अधिकृत वेबसाइटवर जा 👇👇 https://www.indianbank.in येथे तुम्हाला लॉगिन विभागात नोंदणी लिंक दिसेल, त्यावर क्लिक करा. त्यानंतर अर्ज भरा. तुमची सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि शुल्क देखील भरा आणि सबमिट करा.

भरती साठीची अधिसूचना काढण्यात आली आहे. येथे वाचा अधिसूचना👇👇

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »