Bank Holiday: सप्टेंबर महिन्यात 15 दिवस बँका बंद राहणार; कोणत्या राज्यांमध्ये सुट्टी राहणार हे जाणून घ्या सविस्तर..

सप्टेंबर महिना हा विविध धर्मांचे आणि संस्कृतींचे सणांनी भरलेला महिना आहे. या महिन्यात गणेशोत्सव, ओणम आणि ईद-ए-मिलाद सारखे सण साजरे केले जातात. या सणांच्या निमित्ताने बँका बंद राहणार असल्याने बँकेचे कामकाज करण्यापूर्वी ही माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

सप्टेंबर महिन्यात बँका कधी बंद राहणार?

सप्टेंबर महिन्यात सुमारे 15 दिवस बँका बंद राहणार आहेत. यात सार्वत्रिक सुट्ट्या, दुसरे आणि चौथे शनिवार आणि विविध राज्यांमधील स्थानिक सणांच्या निमित्ताने घेतलेल्या सुट्ट्यांचा समावेश आहे.सप्टेंबर महिना रविवारी सुरू होत असल्याने, देशभरातील सर्व बँका महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १ तारखेला बंद राहणार आहेत. सप्टेंबरमध्ये एकूण १५ दिवस बँका बंद राहणार असून, यात शनिवार आणि रविवार या चार दिवसांचा समावेश आहे. शिवाय, प्रत्येक राज्यातील स्थानिक सणांनुसार अतिरिक्त सुट्ट्या असतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांची सोय लक्षात घेऊन दर महिन्याच्या सुरुवातीला बँकांच्या सुट्ट्यांची यादी जाहीर करते. गणेशचतुर्थी ते इद-उल-फित्र या सणांच्या कालावधीत बँकांना अनेक दिवस सुट्टी राहणार आहे. कोणत्या दिवशी कोणती सुट्टी आहे आणि कोणते दिवस शनिवार-रविवार आहेत हे जाणून घेऊया..

7 सप्टेंबर- रोजी गणेश चतुर्थी असल्याने मुंबई, नागपूर, अहमदाबाद, बंगळूरु, भुवनेश्वर, हैद्राबाद, पणजी या शहरांमध्ये बँकांना सुट्टी राहणार आहे.

8 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी राहणार आहे.

14 सप्टेंबर: दुसरा शनिवार आणि ओणम या दोन्ही निमित्ताने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.


15 सप्टेंबर: रविवार असल्याने देशभरातील सर्व बँका बंद राहणार आहेत.


16 सप्टेंबर: बाराफवात आणि ईद-ए-मिलाद या सणांच्या निमित्ताने गुजरात, मिझोरम, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मणिपूर, जम्मू, केरळ, उत्तर प्रदेश, नवी दिल्ली, छत्तीसगड आणि झारखंड या राज्यांमधील बँका बंद राहणार आहेत.


17 सप्टेंबर: इंद्रजात्रा आणि ईद-ए-मिलाद (मिलाद-उन-नबी) या सणांच्या निमित्ताने सिक्कीम आणि छत्तीसगड या राज्यांमधील बँका बंद राहणार आहेत.

18 सप्टेंबर (बुधवार): लबसोल या सणाच्या निमित्ताने सिक्कीममध्ये बँका बंद राहणार आहेत.


20 सप्टेंबर (शुक्रवार): ईद-ए-मिलाद-उल-नबी या सणाच्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.


21 सप्टेंबर (शनिवार): श्री नारायण गुरु समाधी दिन या निमित्ताने केरळमध्ये बँका बंद राहणार आहेत.


22 सप्टेंबर (रविवार): महाराजा हरिसिंह यांच्या जयंतीच्या निमित्ताने जम्मू आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत.

या सुट्ट्यांबद्दल अधिक माहितीसाठी आपण आरबीआयच्या संकेतस्थळाला/ वेबसाइटला 👇👇 https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx भेट देऊ शकता.

पत्रकार -

Translate »