रेशन कार्ड धारकांसाठी मोठा बदल: मोफत तांदूळ बंद, मसाल्यांसह ‘या’ नवीन ९ वस्तूंचा समावेश..
देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वात मोठा फायदा गरीब आणि गरजू लोकांना होतो.
सरकार सर्व रेशन कार्डधारकांना मोफत अन्नधान्य देत होते. पण आता या योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे.पूर्वी सरकार रेशन कार्ड धारकांना मोफत तांदूळ पुरवत होते. मात्र आता नवीन निर्णयानुसार, तांदूळ ऐवजी 9 आवश्यक वस्तू देण्यात येणार आहेत.
केंद्र सरकारच्या मोफत रेशन योजनेचा स्वरूप बदलणार आहे. आतापर्यंत जेथे फक्त मोफत तांदूळ दिला जात होता, तर आता गहू, डाळी, हरभरा, साखर, मीठ, मोहरीचे तेल, मैदा, सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश आहे. यामुळे नागरिकांच्या आहारात पोषणाची पातळी वाढेल आणि त्यांचे आरोग्य सुधारेल, अशी अपेक्षा सरकारची आहे.केंद्र सरकारच्या या नव्या निर्णयामुळे देशातील लाखो नागरिकांचे जीवनमान बदलणार आहे.