Tomato Market : नाशिकमध्ये टोमॅटोची सर्वाधिक आवक, बाजारभाव काय?

0

साप्ताहिक बाजार अहवालानुसार, टोमॅटोची आवक वाढली असतानाही, मागील आठवड्यात त्यांच्या दरात 19% ची वाढ झाली आहे. देशपातळीवर मागील आठवड्याच्या तुलनेत टोमॅटोच्या आवक मध्ये 3.9 टक्के वाढ झाली आहे.नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो बाजारात गेल्या काही दिवसांपासून आवक वाढल्यामुळे टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. मागील आठवड्यात सर्वाधिक आवक झाल्याने बाजारात टोमॅटोची पुरेशी उपलब्धता आहे. सध्या 20 किलो टोमॅटोच्या क्रेटला सरासरी 1000 ते 2100 रुपये दर मिळत आहे.

काल, 30 ऑगस्ट रोजी, नाशिक बाजारात सुमारे 7913 क्विंटल टोमॅटोची आवक झाली. यापैकी सामान्य टोमॅटोला 1100 ते 1800 रुपये, पंढरपूरमध्ये हायब्रीड टोमॅटोला 800 रुपये, कल्याणमध्ये 1500 रुपये, मुरबाडमध्ये 3500 रुपये, अकलूजमध्ये 1000 रुपये, पुणेमध्ये 1300 रुपये आणि मंगळवेढ्यात 1100 रुपये दर मिळाला.

टोमॅटोला विविध बाजारपेठांमध्ये वेगवेगळे दर मिळाले. पनवेलमध्ये 2100, मुंबईमध्ये 2200, रत्नागिरीत 1800, सोलापूरमध्ये वैशाली टोमॅटोला 800, जळगावमध्ये 1500 आणि भुसावळमध्ये 1200 रुपये प्रति क्विंटल असे दर निश्चित झाले.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »