Red LadyFinger: बाजारात चमकली लाल भेंडी! बाजारात मोठी मागणी,काय आहे या भेंडीत वेगळेपण?
अजंटा कंपनीने विकसित केलेल्या कुमकुम या संकरित भेंडीच्या वाणाने शेतकरी आणि व्यापारी दोन्हींचे लक्ष वेधले आहे. या वाणातून इतर भेंडीच्या वाणांपेक्षा अधिक प्रमाणात उत्पादन घेता येते. बाजारपेठेत या लाल रंगाच्या भेंडीला प्रचंड मागणी असून, त्याला किलोमागे ७०-८० रुपये इतका उच्च भाव मिळतो. या वाणाची आणखी एक खासियत म्हणजे त्याचे झाड उंचीने कमी असते, बाजारात या वाणाला असलेली मागणी आणि त्याला मिळणारा उच्च भाव शेतकऱ्यांसाठी आर्थिक फायद्याची बाब आहे.
भारतात पारंपरिकपणे हिरव्या भाज्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, बदलत्या काळात ग्राहकांच्या पसंतीतही बदल होत आहे. आता ग्राहक केवळ हिरव्याच नव्हे तर वेगवेगळ्या रंगांच्या भाज्यांचा शोध घेत आहेत. हे रंग पूर्णपणे नैसर्गिक असून त्यामुळे भाज्यांच्या पोषण मूल्यात कोणताही फरक पडत नाही. याच पार्श्वभूमीवर बाजारात लाल भेंडीचा प्रवेश झाला आहे. हिरवी भेंडी जितकी आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकीच लाल भेंडीही आहे. यात लोह, जस्त, कॅल्शियम आणि प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात.
लाल भेंडीला हिंदीत ‘कुमकुम’ भेंडीदेखील म्हणतात.उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पिकवली जाणारी ही लाल भेंडी, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर घालत आहे. ही भेंडी फक्त स्वादिष्टच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. कमी वेळात तयार होणारी ही भेंडी, हृदयाच्या आजारांपासून आपले रक्षण करते, कारण ती शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी करते.
लाल भेंडीचा इतिहास
वाराणसीच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हेजिटेबल रिसर्चने हे लाल रंगाची भेंडी विकसित केली आहे. ही भेंडी आता उत्तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये लागवड केली जात आहे. याठिकाणी मागणी असल्याचेही दिसत आहे.काशी लालिमा या जातीची भेंडी आहे. सुरुवातीला लाल रंगाच्या काशी ललिमा भेंडीच्या बियाणे उपलब्ध होण्याची समस्या होती. परंतू आता नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन ने काशी लालीमा बियाणे shop.mystore.in वर उपलब्ध करून दिले आहे. या पोर्टलवरून बियाणे मागवून शेतकरी मागवू शकता.तसेच काशी लालीमा बियाणे हे तुम्ही https://kisanjeevan.com/product/bhindi-kashi-lalima-red-lady-finger-seeds/ इथून मागवू शकता.
आरोग्यासाठी फायदेशीर
लाल भेंडी हा निसर्गाचा एक अद्भुत उपहार आहे. यामध्ये ६६% सोडियम असून ते शरीरातील पाणी आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच, यामध्ये असणारे ५% प्रोटीन शरीरातील पेशींचे पुनर्निर्माण करून आपल्याला सक्रिय ठेवते. एंथोसायनिन आणि फेनोलिक्स या संयुगांमुळे लाल भेंडीला तिचा लाल रंग आणि अनेक आरोग्यदायी गुणधर्म मिळतात. ही संयुगे शरीरातील पेशींचे नुकसान रोखून, रोगप्रतिकारक शक्ती वाढवून आणि दाह कमी करून आपल्याला निरोगी ठेवतात.
लाल भेंडी विटामिन बी कॉम्प्लेक्सचा एक उत्तम स्रोत आहे. हे विटामिन्स शरीरातील ऊर्जा उत्पादन, मूड स्विंग्स नियंत्रण आणि मेंदूच्या कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहेत. गर्भवती महिलांसाठी लाल भेंडी खूप फायदेशीर आहे कारण त्यात असलेले पोषक तत्व गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या विकासासाठी आवश्यक असतात. तसेच, लाल भेंडी मुलांच्या मानसिक विकासासाठी आणि त्वचेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
नॅशनल सीड्स कॉर्पोरेशन लिमिटेडच्या माहितीनुसार, लाल भेंडीला बाजारात जास्त किंमत मिळाली आहे. लाल भेंडी ही हिरव्या भेंडीप्रमाणेच घेतली जाते. काशी लालिमाची पेरणी 15 जून ते 15 जुलै या कालावधीत केली जाते. 3.5 ते 4 किलो बियाणे प्रति एकरसाठी लागते.15 फेब्रुवारी ते 15 मार्च या कालावधीत देखील 5 ते 6 किलो प्रति एकर याप्रमाणे लाल भेंडीची लागवड करता येते.काशी लालिमाच्या बिया पेरल्यानंतर 45 दिवसात पहिली तोडणी केली जाते.या जातीच्या प्रत्येक रोपातून 20 ते 22 भेंडीचे उत्पादन मिळते.लाल भेंडीचे सरासरी उत्पादन 150 ते 180 क्विंटल प्रति हेक्टर मिळते.