सोहळ्यास मा साहेब जिजाऊ तसेच मातोश्री अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशज्यांची उपस्थिती ………………………………………… कैलास सोनवणे (दिघवद वार्ताहर): हिंदूधर्म रक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म सोहळा समिती आयोजित पु.अहिल्यादेवी यांच्या भव्यदिंडी पालखी सोहळ्याने रविवारी त्र्यंबकनगरी दुमदुमली होती. ज्यावेळेस मातोश्रींचा जाण्याची वेळ होती त्यावेळी संपूर्ण मावळ प्रांत हा मातोश्रीच्या दर्शनासाठी येत होता संपूर्ण मावळ प्रांतामध्ये महेश्वरी मध्ये वारकऱ्यांच्या भजन कीर्तनने संपूर्ण मावळ प्रांत हा दुःखाच्या छायेत होता. महेश्वरी घाटावर 17 95 मध्ये मातोश्रींची ज्योत मावळी. म्हणूनच त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये ही टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये भजन कीर्तनाच्या स्वरूपात भव्यदिंडी सोहळा काढण्यात आला.अहिल्यादेवी पुण्यतिथी निमित्त जन्मोत्सव समिती तर्फे दरवर्षी पालखी सोहळापु.अहिल्यादेवींनी बांधलेल्या कुशावर्तावर आरती सोहळा होत असतो. त्रंबकेश्वर मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते त्रंबकराज मंदिर ते कुशावर्त पर्यंत भव्यदिंडी सोहळा निघाला यामध्ये लहान लहान चिमुकले वारकऱ्यांच्या विषयांमध्ये या दिंडी सोहळ्याला रंगत आली. तीन तास हा सोहळा चालू होता पाणी पाऊस यांनी तीन तास त्र्यंबकेश्वर नगरीमध्ये दडी दिली हे एक मातोश्रीच्या पालखीने एक आचार्य झाले. नवनाथ त्रंबक नगरीमध्ये इतका वेळ पाऊस थांबणे म्हणजे मुश्किलच असते. सर्व महिला पुरुष होळकर प्रेमी या सोहळ्यास उपस्थित होते रामराज्याचे भगवं निशाण आणि होळकर शाई चे बांडे निशान संपूर्ण त्रंबक नगरीमध्ये फिरत होते. या सोहळ्यास मासाहेब जिजाऊंचे वंशज राजे अमरसिंग जाधवराव, होळकरांची वंशज श्रीमंत नानासाहेब होळकर, मुकुंदराज होळकर सह पत्नी उपस्थित होते. तसेच फिल्मी एक्टर प्रवीण तरडे यांनी या पायी दिंडी सोहळा हजेरी लावली. त्र्यंबकेश्वर ट्रस्ट अध्यक्ष व सर्वच विश्वस्त उपस्थित होते. समितीचे प्रमुख समाधान भाऊ बागल यांनी या सोहळ्याचे आयोजन करून संपूर्ण त्र्यंबक नगरी मध्ये हा ऐतिहासिक स्वरूपात हा सोहळा पार पडला. दिंडी सोहळ्यानिमित्त दिंडी मार्गावर लाखो भाविक भक्तांची गर्दी जमली. दिंडी पालखी सोहळा कुशावर्तावरती जाता पु.अहिल्यादेवींच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करुन गोदावरी व अहिल्यादेवींची आरती करण्यात आली.वारकरी शिक्षण संस्थेच्या दोनशे विद्यार्थ्यांनी या पालखी सोहळ्यात आकर्षण निर्माण केले होते. समिती कार्यवाहक समाधानजी बागल, श्याम भाऊ गोसावी, दत्तू भाऊ बोडके, विनायक काळदाते ज्ञानेश्वर ढेपले, वैभव भाऊ रोकडे, किसन दडस सर, कल्पेश महाराज साळे, शशिकांतजी कोथमिरे,शरद जाधवअॅड.मंडाले,कोथमिरे दादा,मोहंती कोथमिरे ,श शोभाताई काळे,शिवाजी ढगे, सागर भाऊ नेमणार, सागर भाऊ घोडके, मच्छिंद्र भाऊ भडांगे,भूषण भाऊ जाधव, राजाभाऊ बाधड देवराम भाऊ रोकडे पंढरी भाऊ कोरडे रामेश्वर खनपटे, शिरोळी सर,अण्णासाहेब सपनार धात्रक साहेब, श्री.रावते, ,गाढे उपस्थित होते. पालखी दिंडी सोहळ्यासाठी नारायणी वारकरी शिक्षण मुलीची संस्था, ताल विकास संस्था, माऊली ज्ञानराज आध्यात्मिक गुरुकुल या संस्थेने या सोहळ्यास भव्य दिव्य करण्यात रंगत आणली आणि हासोहळा भव्य दिव्य पार पडला.