Maharashtra Rain : खानदेशात पावसाचा धुमाकूळ; राज्यात ‘या’ ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाचा इशारा..
मराठवाडा आणि विदर्भात काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. सध्या राज्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. या वर्षीच्या मॉन्सून हंगामात आतापर्यंत राज्यात सरासरीपेक्षा २६ टक्के अधिक पाऊस झाला आहे.अरबी समुद्रात असलेले चक्रीवादळ आता शांत झाले आहे, परंतु त्याचा परिणाम अजूनही दिसून येत आहे. यामुळे पश्चिम विदर्भ आणि परिसरात पावसाची शक्यता आहे.वाऱ्यांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.
खानदेशात सलग तीन-चार दिवसांपासून जोरदार पावसाचा धुंदुक्यात शेतकरी हैराण झाले आहेत.सततच्या पावसामुळे उडीद आणि मूग ही पिके पूर्णपणे नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. विशेषतः कापूस पिकासाठी अतिवृष्टी ही संकटासारखी ठरत आहे. खानदेशात मोठ्या प्रमाणावर कापूस पिकवले जाते. परंतु या वर्षी अपेक्षित पावसापेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे कापूस पिकाला मोठा फटका बसला आहे. काळ्या कसदार जमिनीत तर ही स्थिती अधिक गंभीर आहे. उडीद आणि मूग पिकांच्या शेंगांना पावसामुळे बुरशी लागण्याची समस्या निर्माण झाली आहे.
मराठवाडा आणि विदर्भात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाचा जोर कमी झाला आहे. तथापि, विदर्भातील काही भागात आजही विजांसह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याने याबाबत येलो अलर्ट जारी केला आहे. राज्यातील उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींची शक्यता आहे.
बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. या ठिकाणी विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे.