सिन्नर तहसील समोर सिन्नर स्वराज्य व हरसुलेकरांचे हातोडा आंदोलन
कैलास सोनवणे दिघवद पत्रकार :सिन्नर तहसील समोर सिन्नर स्वराज्य व हरसुलेकरांचे हातोडा आंदोलन..
पिण्याच्या पाण्यात मिक्स होणार डेअरीच घाण पाणी बंद करण्यासाठी सिन्नर स्वराज्य पक्ष व हरसुले ग्रामस्थ यांनी तहसील समोर तालुका अध्यक्ष शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली हातोडा आंदोलन ३/९/२०२४रोजी १२ते१२.३०वा.करण्यात आले .तहसिलदार देशमुख साहेब व नायब तहसिलदार मुंदंडासाहेब यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेत न्याय देण्याची हमी दिली.
यावेळी हातात हातोडे(घन) घेऊन डेअरी मालकाचा निषेध
करण्यात आला.
यावेळी आंदोलकांनी धरणात येणार डेअरीच घाण पाणी बंद झालच पाहिजे….
घाण पाणी सोडणारया डेअरी मालकावर कारवाई झालीच पाहिजे..।..
हरसुले येथील गावाला स्वच्छ पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे….
हरसुलेकरांचे आरोग्य वाचवलेच पाहिजे….
हरसुलेकरांना न्याय मिळालाच पाहिजे….
अशा घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
यावेळी तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले.
आठ दिवसांत न्याय न मिळाल्यास डेअरीसमोर महिला पुरुष घेऊन आमरण उपोषण करण्यात येईल.
निवेदन दि.३/९/२०२४
प्रती,
माननीय मुख्यमंत्री साहेब
महाराष्ट्र
माननीय आरोग्य मंत्री
महाराष्ट्र
माननीय वनमंत्री
महाराष्ट्र
माननीय कलेक्टर साहेब
नासिक
माननीय तहसीलदार साहेब
सिन्नर
पोलीस निरीक्षक साहेब
पोलीस स्टेशन सिन्नर
विषय-हरसुले येथील दुध डेअरी कंपनीचे विषारी सांडपाणी हरसुले बंधारयात सोडल्याने ग्रामस्थांचे आरोग्य ,जीव धोक्यात. ते विषारी सांडपाणी बंधारयात सोडणे थांबवुन कंपनीवर कारवाई करत न्याय देणे बाबत.
माननीय महोदय,
आपणास स्वराज्य पक्ष व हरसुले ग्रामस्थ विनंतीपुर्वक कळवितो की हरसुले गावात बंधारा आहेत. सदर बंधारयात शासकीय निधीने विहीर खोदून पाईपलाईन टाकून हरसुले गावाला पाणीपुरवठा योजना राबवलेली आहेत.सदर बंधारयावर गावची शेती व कुटुंब अवलंबून आहेत.
परंतु सदर बंधारयात हरसुले येथील डेअरी कंपनीचे विषारी सांडपाणी सोडल्याने हरसुले गावचे आरोग्य धोक्यात आले आहेत. विषारी सांडपाण्याने बंधारयातील पाणी दुषीत झाले आहेत. तेच दुषीत पाणी ग्रामपंचायत गावाला पाजत आहेत. त्यामुळे अनेक महिला, मुल,वयोवृद्ध साथीच्या रोगाने आजारी पडले आहेत.
सदर रगेल,बेजबाबदार मालकाला अनेक वेळा ग्रामस्थांनी सांगुनही सदर बेफिकिरी मालक हेतुपूर्वक दुर्लक्ष करत आहेत.विशेष म्हणजे सदर डेअरी, कंपनीचे मालक सिन्नर तालुका विधानसभेचे ४वेळा आमदार माणिकराव कोकाटे साहेब आहेत. त्यांची जनतेची जबाबदारी असताना बेफिकिरी दाखवत आहेत व खासदार वाजेही लक्ष देत नाहीत.मग यांना लोकप्रतिनिधी का करायचे?त्यांचा जाहीर निषेध.
सदर मालकावर कारवाई करुन सदर डेअरीचे कंपनीचे विषारी सांडपाणी सदर बंधारयात सोडणे थांबवावे यासाठी मंगळवार दि.३/९/२०२४रोजी सकाळी११.३०वाजता तहसील समोर लोकशाही पध्दतीने हातोडा आंदोलन करत मागणी करत आहोत. आपण न्याय देत हरसुले ग्रामस्थांचे जीव वाचवावे हि विनंती.अन्यथा लोकप्रतिनिधी यांची गाडीपुढे झोपणार.आमरण उपोषण आंदोलन करणार
कळावे
शरद तुकाराम शिंदे पाटील
सिन्नर तालुकाप्रमुख
स्वराज्य पक्ष सिन्नर व ग्रामस्थ हरसुले
शिवाजी गुंजाळ संघटक
संदिप लोंढे
जयश्री गायकवाड
महिला आघाडी अध्यक्ष
प्रमिला लोंढे
मंगला मोरे
व खालील हरसुले गावचे ग्रामस्थ
शंकर सुकदेव शिंदे
ज्ञानेश्वर सुरेश शिंदे ग्रा.प. सदस्य
पवन शिंदे
प्रकाश रंगनाथ शिंदे
रामबाबा शिंदे
खंडेराव शिंदे
मुकुंद शिंदे
तानाजी शिंदे
रतन शिंदे
रतन जाधव
प्रकाश सोपान शिंदे
हरीभाऊ जाधव
ज्ञानेश्वर पोपट शिंदे
किसन शिंदे
पिनुदादा शिंदे
रामभाऊ मुरलीधर शिंदे
सुरेखा वडस्कर
म्हाळसाबाई पवार
काशाबाई शिंदे
माधुरी बोंडवे
वर्षा लगट
स्मिता चौधरी
माधवी पवार
मनकर्णिका गायकवाड
बालाबाई पवार
दुर्गा गायकवाड
लिलाबाई तुपे
बेबी गायकवाड
सकुबाई माळी