कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विविध कागदपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिल अहमदनगर येथे जाण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते हिरवा झेंडाराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): कोपरगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना विविध कागदपत्र काढण्यासाठी सिव्हिल हॉस्पिल अहमदनगर येथे जाण्यासाठी आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सहकार्यातून दर महिन्याप्रमाणे देण्यात आलेल्या वाहनांना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनीलजी गंगूले, माजी नगरसेवक रमेशजी गवळी, फकीरमामु कुरेशी, युनूसभाई कच्छी, राकेशजी शहा, कैलासजी संवत्सरकर, नसीरभाई कुरेशी, अब्दुलभाई शेख आदींसह दिव्यांग बांधव उपस्थित होते.