मोठी बातमी! दर वाढल्यानंतर कांद्याच्या दरावर सरकारचा निर्णय ; कांदा स्वस्त करण्याचा सरकारचा प्रयत्न..
कांद्याच्या दरात झालेली वाढ शेतकऱ्यांना फायद्याची ठरली आहे . दिल्ली-एनसीआरमध्ये सरकार 35 रुपये किलोच्या दराने कांदा विक्री करून भाव नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहे.शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान असले तरी, ग्राहकांच्या खिशाला चटका बसत आहे. या वाढत्या भावांचा सामना करण्यासाठी, सरकारने दिल्ली-एनसीआरमध्ये कांदा 35 रुपये किलोच्या दराने उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.कांद्याचा भाव 60 रुपये किलोवर पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने स्वतःहून सवलतीच्या दरात कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे.दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना दिलासा देण्यासाठी, केंद्र सरकारने आजपासून 35 रुपये किलोच्या दराने कांदा विक्री सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निर्देशानुसार, नाफेड आणि एनसीसीएफ या सरकारी संस्थांमार्फत ही कांदे विक्री केली जाणार आहे.या संस्थांनी गेल्या वर्षीही टोमॅटो आणि कांद्याचे भाव वाढल्यावर नागरिकांना स्वस्त दरात खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले होते.
वाढत्या महागाईचा सामना करत असलेल्या जनतेला मदत करण्यासाठी, सरकारने पीठ, डाळ आणि तांदूळ या आवश्यक खाद्यपदार्थांची स्वस्त दरात विक्री सुरू केली आहे. ‘भारत’ या ब्रँड नावाने ही उत्पादने गेल्या वर्षी बाजारात आली होती.