1 सप्टेंबरनंतर लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! लाडक्या बहिणीला 4500 ऐवजी 1500 रुपये मिळणार..
राज्य सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सप्टेंबर महिन्यातही सुरू राहणार आहे. या योजनेची मुदतवाढ झाल्याने अनेक महिलांना दिलासा मिळाला आहे. तथापि, या योजनेच्या नियमावलीत काही बदल करण्यात आले आहेत.लाडकी बहीण योजनेत बदल झाला आहे. आता 1 सप्टेंबरनंतर नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाहीत. त्यांना फक्त त्या महिन्याचे पैसे मिळतील ज्या महिन्यात त्यांनी नोंदणी केली असेल. या योजनेची मुदत वाढवण्यात आली आहे, पण नवीन नियम लागू झाले आहेत.महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे.
या योजनेच्या सुरुवातीला नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे देण्यात आले होते. पण, 1 सप्टेंबरनंतर या योजनेत नाव नोंदवणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्टचे पैसे मिळणार नाहीत. आतापासून या योजनेत नोंदणी करणाऱ्या महिलांना फक्त त्याच महिन्यापासून पैसे मिळतील, ज्या महिन्यात त्यांनी नोंदणी केली असेल. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी गडचिरोली येथे एका कार्यक्रमात ही माहिती दिली.
ज्या महिलांनी आधीच अर्ज केला होता, त्यांना रक्षाबंधनाच्या निमित्ताने दोन हप्ते मिळाले आहेत. मात्र, जुलैमध्ये अर्ज केलेल्या काही महिलांचे अर्ज अजूनही तपासले जात आहेत. ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत, त्यांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे पैसे मिळतील. परंतु, 1 सप्टेंबरनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना फक्त त्याच महिन्याचा लाभ मिळेल.
अनेक महिला अजूनही या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही भागात तांत्रिक समस्यांमुळे महिलांना अर्ज करण्यात अडचण येत आहे.सर्व अडचणी लक्षात घेता राज्य सरकार या योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत एका महिन्याने वाढवल्याचे सांगण्यात येत आहे.