दिघवद विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार) दिघवद विद्यालयात शिक्षक दिन उत्साहात साजरा.
श्री छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक मंडळ संचलीत स्वामी विवेकानंद विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती अर्थात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेचे मुख्याध्यापक टी. एम.पेंढारी यांचे मार्गदर्शनाने शाळेतील ज्येष्ठ शिक्षक एस.डी.गांगुर्डे व के.पी. गांगुर्डे यांनी शिक्षक दिनाच्या या सर्व कार्यक्रमाचे नियोजन केले. शिक्षक दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी मुख्याध्यापिका म्हणून तनुष्का मापारी,पर्यवेक्षिका म्हणून कल्याणी नवले व इयत्ता 10वी अ,ब च्या सर्व विद्यार्थी शिक्षकांनी पाचवी ते नववी पर्यंतच्या सर्व वर्गांच्या अद्यापनाची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पार पाडली तसेच विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या शिक्षकांना उत्तम असा प्रतिसाद दिला. शेवटी गुरुपूजन व गुरुवंदनाच्या कार्यक्रमांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी नवीन विद्यार्थी शिक्षकांच्या अध्यापनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थी शिक्षकांनी सुद्धा शिक्षकांच्या भूमिकेमध्ये जाऊन त्यांना आलेले अनुभव, त्यांना मिळालेली प्रेरणा तसेच एक शिक्षक म्हणून वावरताना असणाऱ्या जबाबदाऱ्यांची जाणीव झाली अशा भावना तनुष्का मापारी, कल्याणी शिंदे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केल्या. तसेच शाळेच्या शिक्षिका भामरे मॅडम व के.पी.गांगुर्डे यांनी शिक्षक दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षक संकेत ठाकरे साहिल हांडगे तेजस्विनी ठाकरे,श्रद्धा खांगळ यांनी तसेच प्रास्ताविक कोमल पवार व आभार प्रदर्शन कल्याणी खांदे हिने केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक टी.एम.पेंढारी,पर्यवेक्षक एस.जी. सोनवणे,उपशिक्षक पाटील एस.व्ही.,गांगुर्डे ऐ.पी.,पेंढारी पी.डी.ठोंबरे ऐ.आर.,एस. जी.गांगुर्डे,पाटील एस.बी., गांगुर्डे जी.के.,सुधीर ठाकरे, गुडगळ ,चंदनशिव सर, शुभम हांडगे,साबळे के.ओ., राठोड एस.बी.,कानडे आर. बी. भामरे ,गांगुर्डे डी. के.,एम. के. गोसावी,गांगुर्डे एस.यन.,गांगुर्डे ओ.आर.,घोलप एस.एम.आदी उपस्थित होते.