नाशिक मध्ये वाढतेय गुन्हेगारी :तरुणाची दगडाने ठेचून हत्त्या
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडतदाराच्या भावाचा मध्यरात्री खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नाशिक : पंचवटी परिसरातील नरोत्तंमभवन समोर रस्त्यावर मार्केट
यार्डात हमाली करणाऱ्या युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना मंगळवार ता.१० रोजी मध्यरात्री सुमारास घडली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस करीत आहेत. अतुल सूर्यवंशी (वय ३२ , रा. पेठ रोड, पंचवटी नाशिक) असे मयताचे नाव आहे.
पेठ रोडवरील राहणाऱ्या बत्तीस वर्षीय अतुल सूर्यवंशी हा मार्केट यार्ड येथे आपल्या मोठ्या भावा कडे हमालीचे काम करत होता. मंगळवार ता.१० रोजी मध्यरात्री सुमारास पंचवटीतील नरोत्तम भवन समोर मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्यावर अतुल यांचा काही संशयितांनी दगडाने ठेचून खून केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी एका संशयितास ताब्यात घेण्यात पंचवटी पोलिसांना यश मिळाले आहे.