अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर
अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर काजीसांगवीः-(उत्तम आवारे)चांदवड तालुक्यातील न्हनावे येथे एक गाव एक गणपती सार्वजनिक गणपती बाप्पा बसविण्यात आले आहेत. या अष्टविनायक गणेश उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ३९ नागरिकांनी रक्तदान केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. अष्टविनायक मित्र मंडळ न्हनावे व जनकल्याण रक्तपिढी नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचे सह रक्तसंकलन करणाऱ्या कर्मचाऱ्याचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले.
त्यानंतर अध्यक्ष यांनी या कार्यक्रमाची रूपरेषा सर्वांसमोर मांडली. या रक्तदान शिबिरात ३९ नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत रक्तदान केले. या रक्तदान शिबिरामध्ये सर्व धर्मातील युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेऊन शुभारंभ केला. या कार्यक्रमाचे सर्व गावकऱ्यांनी कौतुक केले. याप्रसंगी गावातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रतिष्ठित मंडळी, युवक बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व रक्तदात्यांना मंडळाकडून चहा व अल्प उपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. सर्व गणेश उत्सव मंडळांनी असेच सामाजिक अभिनव उपक्रम कार्यक्रम राबवावे अशी अपेक्षा मंडळातर्फे व्यक्त करण्यात आली.