चांदवड ते लासलगाव रस्त्यावर पडले खड्डे
कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): चांदवड ते लासलगाव रस्त्यावर पडले खड्डे . दिघवद वार्ताहर चांदवड लासलगाव हा रस्ता विंचूर प्रकाशा गुजरात महामार्ग आहेत या रस्त्यावर खुपच वहानांची वर्दळ आहेत त्यामुळे या रस्त्यावर जागोजागी लहान मोठे खड्डे पडले आहेत दोन वहान एकमेकांना जवळुन जात असतांना खडयामधे जाते व त्यामुळे मागच्या वहाण धारकांना अचानक ब्रेक न लागल्यामुळे पुढच्या खडयातुन जाणाऱ्या वाहनावर जाऊन धडकते त्यामुळे लहान-मोठे अपघात या रोडवर होत आहेत लहान वाहनधारकांना खड्डा न दिसल्यामुळे अचानक ब्रेक मारावा लागतो व खड्ड्यात वाहन जाऊन चाकण निखळण्याची शक्यता आहेत त्यामुळे या रस्त्यावर जागा जागी पडलेले खड्डे बुजवण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे फुलांच्या मागेपुढे प्रत्येक ठिकाणी या मार्गावर खड्डे पडले आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी खड्डे न दिसल्यामुळे लहान मोठे अपघात होत आहेत तर जागोजागी स्पीड बेकर केले असून त्यावर सफेद रंगाचा पट्टा न मारल्यामुळे वाहनधारकांना अपघात होण्याची शक्यता आहे रहदारीमुळे व पावसाळा असल्याने रोजच खड्डे मोठाले होत आहेत तरी संबंधित विभागाने खड्डे बुजवावे अशी मागणी वहाणधारकांनी केली आहे दिघवद येथे एकाच वेळी दोन्ही वहान आल्यावर छोटे व दोन चाकी मोटारसायकल वाले पडत आहे अशे दिघवद येथील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बबनराव गाडे यांनी सांगितले.