चांदवड पोलीस स्टेशनची गुजरातकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या टाटा इंट्रासह दहा लाख 47 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्तचांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची धमाकेदार कामगिरी दिघवद प्रतिनिधी : कैलास सोनवणे
चांदवड पोलीस स्टेशनची गुजरातकडे विदेशी मद्य घेऊन जाणाऱ्या टाटा इंट्रासह दहा लाख 47 हजार रुपयांचा मद्यसाठा जप्त
चांदवड पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची धमाकेदार कामगिरी
दिघवद प्रतिनिधी : कैलास सोनवणे
चांदवड : चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांनी मंगरूळ या ठिकाणी अत्यंत गुप्त अशा माहिती द्वारे एक टाटा इंट्रा जीप मध्यसाठ्यासह ताब्यात घेतली असून या गाडीतून एक लाख 22 हजार 400रुपयांची रॉयल चॅलेंज विस्की ,
पन्नास हजार चारशे रुपयांची रॉयल चॅलेंज प्रीमियम व्हिस्की,
36 हजार रुपयाची डीएसपी ब्लॅक डीलक्स व्हिस्की
त्याचप्रमाणे दोन लाख 57 हजार 200 रुपयांची इम्पेरियल ब्ल्यू व्हिस्की असे एकूण 128 बॉक्स विदेशी मद्याचे पकडले आहेत यात चार लाख सहासष्ट हजार दोनशे ऐशी रुपयांची दारू व सहा लाख रुपये किंमतीचा टाटा इंट्रा जीप यासह दहा लाख सहासष्ट हजार दोनशे ऐशी रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला आहेचांदवड पोलिसांनी वाहतूक करताना आढळल्याने सदर या दोघा इसमां विरोधात चांदवड पोलीस स्टेशनला पोलीस शिपाई विक्रम बस्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी वाहनासह अवैध मद्याचा माल ताब्यात घेतला आहे
सदर प्रकरणात दोन आरोपी असून अमजद झुल्कीखार सय्यद, नवापुर व ललित कुमार रामूभाई सुमन, उदवाडा, जि बलसाड ( गुजराथ )यांना टाटा इंट्रा जीप कुमांक MH15 JC 0583 ह तिच्यासह ताब्यात घेतले आहे
सदरच्या कारवाईत चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ , पीएसआय भाऊसाहेब नरे पोलीस नाईक सुनील जाधव पोलीस नाईक स्वप्नील रंधे विक्रम बस्ते संतोष लोखंडे दिनेश सूळ व चित्ते दादा कमल अहिरे यांनी विशेष परिश्रम घेऊन अवैधरित्या मद्यवाहतुक करणाऱ्या व्यक्तींना गजाआड केले .
सदरच्या घटनेमुळे चांदवड पोलीस स्टेशनच्या दमदार कामगीरीमुळे पोलीस प्रशासनाचे तालुक्यातुन अभिनंदन करण्यात येत आहे