Maharashtra Rain Update: परतीच्या पावसाचा जोर वाढणार ! राज्यात मुसळधार पावसाचा इशारा ; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा अलर्ट..
मान्सूनची आता आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. हा मान्सून पश्चिम राजस्थानपासून सुरू होऊन गुजरातच्या कच्छ भागात पोहोचला आहे. या परिस्थितीमुळे बंगालच्या उपसागरात पुढच्या २४ तासांत कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.
पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.राज्यातील पाऊस वाढणार असून, विदर्भ, मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागात मुसळधार पाऊस पुढील तीन ते चार दिवस पडणार आहे. मध्य महाराष्ट्र, कोकणात देखील पाऊस पुढील तीन दिवस हजेरी लावणार आहे.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा:
हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा जारी केला आहे. पुढील काही दिवसांत मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यलो अलर्ट: पालघर, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, लातूर, धाराशिव, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
ऑरेंज अलर्ट: रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुणे जिल्ह्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. हवामान विभागाने याबाबत रेड अलर्ट जारी केला आहे. विशेषतः घाटमाथ्यावर पावसाचा जोरदार जोर असण्याची शक्यता आहेअहमदनगर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्यामुळे सीना नदीला पूर आला आहे. यामुळे नगर-कल्याण महामार्ग बंद करावा लागला आहे. हवामान विभागाने पुढच्या काही दिवसांतही जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.बंगालच्या उपसागरातील बदलत्या हवामानामुळे राज्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.