Onion Market : उन्हाळ कांद्याची कळवण बाजारात सर्वाधिक आवक, आठवड्याच्या सुरुवातीला कांद्याला काय भाव मिळाला?

सोमवार दि.२३ सप्टेंबर रोजी राज्यातील बाजार समितीमध्ये कांद्याची 01 लाख 2 हजार 628 क्विंटलची आवक झाली. काय भाव मिळाला? जाणून घेऊया..

उन्हाळी कांद्याला लासलगावमध्ये सर्वाधिक 4870 रुपये, तर सोलापूरमध्ये लाल कांद्याला 3800 रुपये मिळाले. येवला, कळवण, चांदवड, मनमाड आणि पिंपळगाव बसवंत या बाजारपेठांमध्येही कांद्याला चांगला भाव मिळाला. अमरावती, धुळे, पुणे आणि कल्याण या ठिकाणीही कांद्याच्या दरात वाढ झाली असून, कल्याणमध्ये नंबर एकच्या कांद्याला सर्वाधिक 4900 रुपये मिळाले.

लासलगाव बाजारात 4 हजार 870 रुपये, येवला बाजारात 04 हजार 451 रुपये, कळवण बाजारात 04 हजार 650 रुपये, चांदवड बाजारात 04 हजार 550 रुपये, मनमाड बाजारात 4500 रुपये तर पिंपळगाव बसवंत बाजाराच्या 700 रुपये दर मिळाला.

सोलापूर बाजारात लाल कांद्याला 03 हजार 800 रुपये, अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये 04 हजार 500 रुपये, धुळे बाजारात 04 हजार 450 रुपये, तसेच लोकल कांद्याला पुणे बाजारात 4 हजार 300 रुपये दर मिळाला.

काल, राज्यातील विविध बाजार समितीमध्ये एकूण 01 लाख 82 हजार 285 क्विंटल कांद्याची आवक झाली. यापैकी नाशिक जिल्ह्यातून एकट्याने जवळपास 88,000 क्विंटल उन्हाळी कांदा बाजारात आला. आज, कांद्याला किमान 2500 रुपये ते कमाल 4800 रुपये प्रति क्विंटल असा सरासरी दर मिळाला.

24 सप्टेंबर 2024 रोजी, पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील येवला अंदरसुल बाजार समितीत उन्हाळी कांद्याला 4600 रुपये, नाशिक बाजार समितीत 4500 रुपये, लासलगाव बाजार समितीत 4700 रुपये, सिन्नर बाजार समितीत 4850 रुपये, कळवण बाजारात 4700 रुपये, सटाणा बाजारात 4750 रुपये आणि पिंपळगाव बसवंत बाजारात 4800 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. याच दिवशी, नाशिक बाजारात 45 क्विंटल पोळ कांद्याची आवक झाली आणि त्याला सरासरी 4000 रुपये दर मिळाला.सोलापूर बाजार समितीत 16,482 क्विंटल लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला सरासरी 3600 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. याचबरोबर, अमरावती फळ भाजीपाला मार्केटमध्ये 3900 रुपये, धुळे बाजारात 4450 रुपये, नागपूर बाजारात 4750 रुपये आणि पाथर्डी बाजारात 4500 रुपये दर मिळाला. तर, पुणे बाजारात लोकल कांद्याला 3900 रुपये दर मिळाला.

पत्रकार -

Translate »