मोठी बातमी! ई-केवायसी नाही, तर रेशन बंद! 31 ऑक्टोबरची शेवटची तारीख, नंतर रेशन बंद
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना गरीबांना स्वस्त धान्य देते. या योजनेचा लाभ घेणाऱ्यांना आता आपली ओळख पक्की करण्यासाठी ई-केवायसी करावे लागेल. ही पद्धत खोट्या लाभार्थ्यांना शोधून काढण्यासाठी आहे. ई-केवायसी न केल्यास 1 नोव्हेंबरपासून धान्य मिळणार नाही. 31 ऑक्टोबरपर्यंत हे काम करून घ्यावे लागेल.
अन्न व सार्वजनिक वितरण विभागाने याबाबत स्पष्ट निर्देश जारी केले आहेत. तथापि, अनेक शिधापत्रिकाधारकांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे, 31 ऑक्टोबरपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यास शिधापत्रिकाधारकांचे नाव रेशनकार्डमधून वगळून त्यांचा लाभ रद्द करण्यात येईल. यामुळे, पुढील 36 दिवसांत राज्यातील चार कोटी आणि जिल्ह्यातील 20 लाख शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे.
अनेक लोक अशी आहेत की, ज्यांना मोफत रेशन मिळण्याचा हक्क नाही तरी ते घेतात. काही लोकांचे मृत्यू झाले असूनही त्यांची नावे अजूनही रेशनकार्डमध्ये आहेत. काही लोक तर बनावट रेशनकार्ड बनवून सरकारच्या योजनांचा गैरफायदा उठवतात. या सर्व गोष्टी थांबवण्यासाठी सरकारने हा नवीन नियम केला आहे. आता सर्वच रेशनकार्डधारकांना ई-केवायसी करावे लागेल. जे लोक ई-केवायसी करणार नाहीत, त्यांची नावे रेशनकार्डमधून काढून टाकली जातील.
एकूण रेशनकार्डधारक: २३,३७,८६५
ई-केवायसी पूर्ण केलेले: २,२४,०४७
ई-केवायसी प्रलंबित: ४,८१,०३३
ई-केवायसी अजूनही बाकी: १६,३२,