Bank Holiday: ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील? सणासुदीच्या तयारीसाठी आताच करा नियोजन..

0

सप्टेंबरचा शेवटचा आठवडा सुरू असून ऑक्टोबरची चाहूल लागली आहे. या वर्षी ऑक्टोबर हा सणांचा महीना म्हणून ओळखला जाणार आहे. गांधी जयंती, नवरात्री, दसरा आणि दिवाळी सारखे मोठे सण याच महिन्यात साजरे केले जातील.

ऑक्टोबरमध्ये सणांची रेलचेल असल्याने बँका सलग अनेक दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेली बँक सुट्ट्यांची यादी तुम्हाला नक्कीच पाहिजे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या यादीनुसार, या महिन्यात बँका सुमारे पंधरा दिवस बंद राहतील. शनिवार-रविवारच्या नियमित सुट्ट्यांसह सणासुदीच्या दिवसांचा समावेश यात होईल. या सुट्ट्यांची तारीख राज्यानुसार वेगवेगळी असू शकते. जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकांमुळेही बँक एक दिवस बंद राहणार आहे. गांधी जयंती, दुर्गापूजा, दसरा, लक्ष्मीपूजा आणि दिवाळी सारखे मोठे सण या काळात येत असल्याने बँकांच्या सुट्ट्यांची संख्या वाढली आहे.

ऑक्टोबरमध्ये बँका किती दिवस बंद राहतील?

1 ऑक्टोबर: जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे बँका बंद राहतील.
2 ऑक्टोबर: गांधी जयंतीच्या निमित्त देशभरातील बँकांना सुट्टी असेल.
3 ऑक्टोबर: जयपूरमध्ये नवरात्रीच्या घटस्थापनेमुळे बँकांना सुट्टी असेल.
6 ऑक्टोबर: रविवार असल्याने देशभरात बँका बंद राहतील.

10 ऑक्टोबर: आगरतळा, गुवाहाटी, कोहिमा आणि कोलकाता येथे दुर्गा पूजा, दसरा आणि महासप्तमीमुळे बँका बंद राहतील.

11 ऑक्टोबर: आगरतळा, बेंगळुरू, भुवनेश्वर, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, इटानगर, कोहिमा, इम्फाळ, कोलकाता, पाटणा, रांची आणि शिलाँग येथे दसरा, महाअष्टमी, महानवमी, दुर्गा पूजा आणि दुर्गा अष्टमीमुळे बँका बंद राहतील.

12 ऑक्टोबर: दसरा, विजयादशमी, दुर्गापूजा यामुळे देशभरातील बँका जवळपास बंद राहणार आहेत.
13 ऑक्टोबर: रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
14 ऑक्टोबर: गंगटोकमध्ये दुर्गापूजा किंवा दसेननिमित्त बँकांना सुट्टी असेल.
16 ऑक्टोबर: लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने आगरतळा आणि कोलकाता येथे बँका बंद राहतील.
17 ऑक्टोबर: महर्षि वाल्मिकी जयंती आणि कांती बिहू या दिवशी बंगळुरू आणि गुवाहाटीमधील बँकांना सुट्टी असेल.
20 ऑक्टोबर: रविवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
26 ऑक्टोबर: चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.
27 ऑक्टोबर: रविवार असल्याने देशभरातील बँकांना सुट्टी असणार आहे.
31 ऑक्टोबर: दिवाळीनिमित्त जवळपास संपूर्ण देशातील बँकांना सुट्टी असणार आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »