पळसाच्या पानांच्या पत्रावळी : एक विसरला गेलेला खजिना ! जेवणाच्या पंगतीतून पत्रावळी का झाली हद्दपार?
कार्यक्रमात जेवणासाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या पळस पानांच्या पत्रावळी सध्याच्या काळात हद्दपार झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.आजकाल, विवाहसोहळे, सप्ताह आणि इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये पळसाच्या पानांच्या पत्रावळींचे स्थान प्लास्टिक आणि थर्माकोलच्या पत्रावळींनी घेतले आहे. यामुळे ग्रामीण भागातही पळसाच्या पानांचा वापर कमी होत चालला आहे. परिणामी, पळसाची पाने गोळा करून आणि पत्रावळी तयार करून उपजीविका करणाऱ्या लोकांचा हा छोटासा व्यवसायही संकटात सापडला आहे.पळसाच्या पानांच्या पत्रावळींचा वापर कमी झाल्यामुले हा रोजगार पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे.
आयुर्वेदात लिंबाड्याच्या झाडाला मोठे महत्त्व असले तरी, पळसाच्या पानांच्या पत्रावळींचा वापरही पारंपरिक जेवणासाठी प्रचलित होता.पळसाच्या पानांच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाड्याच्या झाडाच्या काडीचा वापर होत असतो. पळसाची पाने कीडमुक्त आणि सहज उपलब्ध असल्याने, त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत होता. या पत्रावळींमध्ये जेवण अधिक स्वादिष्ट आणि सुपाच्य वाटत असे. मात्र, आधुनिकीकरणाच्या काळात प्लास्टिक आणि थर्माकोलच्या पत्रावळींनी पळसाच्या पानांचे स्थान घेतले आहे. यामुळे एकीकडे आपली परंपरा लोप पावत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचे नुकसान होत आहे.
आदिवासींचा परंपरागत व्यवसाय म्हणजे पळसाच्या पानांच्या पत्रावळी तयार करणे हा होता. मात्र, आधुनिक काळात प्लास्टिक आणि कागदाच्या वापरामुळे पळसाच्या पानांची मागणी कमी झाली आहे. यामुळे आदिवासींचा हा छोटासा व्यवसायही संकटात सापडला आहे.