Lasalgaon: लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याचा भाव काय ? कांद्याच्या दरात चढ उतार ; वाचा सविस्तर..
काल राज्यातील बाजार समित्यांमध्ये एक लाख 37 हजार 278 क्विंटल कांदा विक्रीसाठी आला. यामुळे कांद्याच्या दरात थोडी घट झाली आहे. काल कांद्याला कमीत कमी 2750 रुपये ते जास्तीत जास्त 4700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला. नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक कांदा विक्रीसाठी आला.
नाशिक जिल्ह्यात 55 हजार क्विंटल तर अहमदनगर जिल्ह्यात 17 हजार क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. या कांद्याला येवला बाजारात चार हजार 150 रुपये, लासलगाव बाजारात 4 हजार 400 रुपये, सिन्नर बाजारात 4 हजार 200 रुपये, संगमनेर बाजारात 3260 रुपये, मनमाड बाजारात 04 हजार 100 रुपये, पिंपळगाव बसवंत बाजार 04 हजार 500 रुपये तर पारनेर बाजारात 4 हजार 75 रुपये दर मिळाला.
सोलापूरमध्ये लाल कांद्याला 4000 रुपये, अमरावतीमध्ये 3500 रुपये, संगमनेरमध्ये 2650 रुपये, पुणेमध्ये लोकल कांद्याला 3900 रुपये आणि मंगळवेढा येथे 3300 रुपये दर मिळाला. तर सोलापूरमध्येच पांढऱ्या कांद्याला 3000 रुपये दर मिळाला.