Edible Oil Rate : खाद्यतेलाचे दर वाढले,आयात साठा असताना खाद्यतेलाचे दर वाढण्यामागचे कारण काय?
सणासुदीच्या आधीच खाद्यतेल खूप महाग झाले आहे. सरकारच्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात मोहरीचे तेल 9.10% आणि पाम तेल 14.16% महाग झाले आहे. दुकानात आणि ऑनलाइन पण मोहरीचे तेल 26% ने महाग झाले आहे.देशात कमी आयात शुल्क आकारून आणलेल्या खाद्यतेलापैकी सुमारे तीस लाख टन साठा उरला आहे. हा साठा देशाची पुढील ४५ ते ५० दिवसांची गरज भागवू शकतो. म्हणून, खाद्यतेलाच्या दरात वाढ करू नये, असे उद्योजकांना सूचित करण्यात आले होते. तरीही, खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. याबाबत केंद्र सरकारने लवकर स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
खाद्य तेल उत्पादकांच्या प्रमुख संघटनांना, म्हणजेच सॉल्व्हेंट एक्सट्रॅक्टर असोसिएशन ऑफ इंडिया, इंडियन व्हेजिटबल ऑइल प्रोड्यूसर असोसिएशन आणि सोयाबीन ऑइल प्रोड्यूसर असोसिएशन यांना खाद्यतेलाच्या आयात शुल्कात वाढ झाल्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत पत्र लिहिण्यात आले आहे. खाद्य आणि सार्वजनिक वितरण विभागाच्या संयुक्त सचिव अनिता कर्ण यांनी लिहिलेल्या या पत्रानुसार, या विषयावर उद्योजक आणि सरकारी अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक आधीच झाली होती.
मंगळवारी झालेल्या बैठकीत स्पष्ट करण्यात आले की, कमी आयात शुल्क आकारून आणलेल्या खाद्यतेलापैकी तीस लाख टन साठा अजूनही उपलब्ध आहे. हा साठा देशाची पुढील पन्हाळीस ते पन्नास दिवसांची गरज भागवू शकतो. त्यामुळे, सण-उत्सवांच्या काळात खाद्यतेलाच्या दरात वाढ करण्याची गरज नाही. तरीही, उद्योजकांनी तेलाचे दर वाढवले आहेत. याबाबत सरकारने उद्योजकांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत.
खाद्यतेलाच्या दरात वाढ झाल्याने सोयाबीनच्या दरातही वाढ झाली आहे. सोयाबीनची किंमत प्रति क्विंटल तीनशे ते सहाशे रुपयांनी वाढली आहे. सरकारने सोयाबीनचा हमीभाव ४८९२ रुपये ठरवला असला, तरी बाजारात सोयाबीनचे दर अजूनही हमीभावापेक्षा कमी आहेत. या परिस्थितीत मध्य प्रदेशातील शेतकरी सोयाबीनला सहा हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळावा, या मागणीसाठी आंदोलन करत आहेत.
केंद्र सरकारने आयात शुल्क वाढवल्यावर खाद्यतेलाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः सोयाबीन तेलाचे दर शंभर सात रुपयांवरून वाढून शंभर तीस ते शंभर पस्तीस रुपये प्रति लिटर झाले आहेत.