Maharashtra News: शिंदे सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत अनेक निर्णय ; वाचा सविस्तर..

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.

👉🏻 मंत्रिमंडळ निर्णय खालीलप्रमाणे :

✅  कोतवालांच्या मानधनात दहा टक्के वाढ. अनुकंपा धोरणही लागू

✅  ग्राम रोजगार सेवकांना आता दरमहा ८ हजार रुपये मानधन तसेच प्रोत्साहन अनुदान

✅  ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह भुयारी मार्गाच्या कामाला गती देणार. एमएमआरडीएला बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य देण्यास मान्यता

✅  ठाणे वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामास गती देणार. १२ हजार २०० कोटींच्या सुधारित आराखड्यास मान्यता

✅  ठाणे ते बोरिवली भुयारी मार्गासाठी १५ हजार कोटी कर्जरूपाने उभारणार

✅  देशी गाईंच्या पालन पोषणासाठी अनुदान योजना.

✅  भारतीय खेळ प्राधिकरणाला आकुर्डी, मालाड व वाढवण येथील जागा. नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स उभारणार

✅  रसायन तंत्रज्ञान संस्थेस ठाणे येथील मौजे खिडकाळीची जागा

✅  राज्य जलसंपत्ती माहिती केंद्र स्थापणार. जलस्त्रोतांचे उत्तम नियोजन करणार

✅  जळगाव जिल्ह्यातल्या भागपुर उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता. ३० हजार हेक्टर जमीन सिंचित होणार

✅  लातूर जिल्ह्यातील हासाळा, उंबडगा, पेठ, कव्हा कोल्हापूर बंधाऱ्याच्या कामास मान्यता

✅  धुळ्याच्या बीएपीएस स्वामीनारायण संस्थेस ग्रामस्थांच्या विकासासाठी जमीन

✅  रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगरच्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला गती देणार. एमएमआरडीए ला जमीन अधिमूल्य भरण्यास सवलत

✅  केंद्राच्या मिठागराच्या जमिनी राज्य शासनाकडे हस्तांतरित करणार. दुर्बलांसाठी घरांच्या योजनांना वेग येणार

✅  पालघर जिल्ह्यातील मुरबे येथे बहुउद्देशीय बंदर प्रकल्प. जेएसडब्ल्यू इन्फ्रास्ट्रक्चर विकासक

✅  धारावीतल्या अपात्र झोपडीधारकांसाठी परवडणारी भाडेतत्त्वावरील घरे योजना; धारावी पुनर्वसन प्रकल्पावर जबाबदारी

✅  सेवानिवृत्ती उपदान, मृत्यू उपदानाची मर्यादा वाढवून २० लाख

✅  अनुसूचित जाती, नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी कृषी स्वावलंबन योजनेचे आर्थिक निकष वाढवले; अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ होणार

✅  सोनार समाजासाठी संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ

✅  जामखेडच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सूत गिरणीला अर्थसहाय्य करणार

✅  राज्यातील होमगार्डांच्या भत्त्यात भरीव वाढ. सुमारे ४० हजार होमगार्डना लाभ

✅  नाशिकचे वैद्यकीय पदवी महाविद्यालय व रुग्णालय शासनाच्या अखत्यारीत घेणार

✅  आयुर्वेद, युनानी महाविद्यालयातील पदभरतीसाठी निवड समिती

✅  राज्यातील आणखी २६ आयटीआय संस्थांचे नामकरण

✅  आर्य वैश्य समाजासाठी श्री वासवी कन्यका आर्थिक विकास महामंडळ

✅  श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर समितीवरील सदस्यांची संख्या वाढवून १५

✅  अधिसंख्य कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा तांत्रिक खंड क्षमापित

✅  बार्टीच्या धर्तीवर ‘वनार्टी’ स्वायत्त संस्था

✅  मेट्रो तीन प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुद्रांक शुल्कात सवलत

✅   जिल्हा परिषदेतील २००५ नंतर रुजू कर्मचाऱ्यांना एक वेळ पर्याय

✅  पंचगंगा नदी प्रदूषणासाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करणार

✅  राज्यात विशेष शिक्षक पदाची निर्मिती. ४८६० पदे

✅  शासन हमी शुल्काचा दर कमी करण्याचा निर्णय. हमी शुल्क माफी मिळणार नाही

✅  अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा. जनजागृतीवर भर

✅  माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा तिसरा अहवाल स्वीकारला

✅  राज्यातील सैनिकी शाळांसाठी आता सुधारित धोरण.

✅  डाळिंब, सीताफळ इस्टेट उभारणार उत्पादकांना मोठा लाभ

✅  महसुली उत्पन्न वाढवण्यासाठी मुद्रांक अधिनियमात सुधारणा

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Translate »