छोटी गुंतवणूक, मोठा फायदा ! ₹5 चा शेअर, 53 लाख रुपये कमाई, कंपनीला 675 कोटीची ऑर्डर
वर्षाच्या सुरुवातीला 1 जानेवारी रोजी हा शेअर 8.03 रुपयांच्या पातळीवर होता.ऊर्जा क्षेत्रातील कंपनी, मार्सन्स लिमिटेड, च्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात प्रचंड वाढ झाली आहे. कंपनीला 675 कोटी रुपयांचा नवीन प्रकल्प मिळाल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला आहे. यामुळे शेअरची किंमत वर्षाच्या सुरुवातीच्या 8 रुपयांपासून वाढून 280 रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
मारसन्स लिमिटेडला 150 मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम मिळाले आहे. या प्रकल्पासाठी कंपनीला NACOF पॉवरकडून 675 कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली यामुळे कंपनीचे शेअर आणखी वाढण्याची शक्यता आहे.
मारसन्स लिमिटेडचा शेअर गेल्या एका वर्षात रॉकेटच्या वेगाने वाढत आहे. वर्षाच्या सुरुवातीला 5.60 रुपये असलेला शेअर आता 280.90 रुपयांच्या पातळीवर स्थिर झाला आहे. या शेअरमध्ये 4900% ची वाढ झाल्याने गुंतवणूकदारांचे नशीब चमकले आहे.
जर एखाद्याने 1 जानेवारी रोजी 1 लाख रुपये गुंतवून या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते, तर त्याला सुमारे 18,797 शेअर्स मिळाले असते. आता हा शेअर 280 रुपयांवर गेल्यामुळे, त्याच्या या शेअर्सची किंमत 52.80 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच, त्याचे गुंतवणूक 50 पटीने वाढले आहे.