PM Kisan Installment : शेतकऱ्यांच्या खात्यात ५ ऑक्टोबरला जमा होणार पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता..

0

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांचे हप्ते ५ ऑक्टोबरला त्यांच्या खात्यात जमा केले जातील.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ५ ऑक्टोबर रोजी शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या दिवशी पीएम किसान योजनेचा १८ वा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ५ वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेच्या पाचव्या हप्त्यासाठी २२५४ कोटी रुपये मंजूर केले आहेत.

देशातील ९.३ कोटी शेतकऱ्यांना जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसानचा १७ वा हप्ता मिळाला होता. तर, नमो शेतकरी महासन्मान निधीचा ४ वा हप्ता केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हस्ते परळी येथे वितरित करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने घाईगडबडीने हा हप्ता वितरित केल्यामुळे अनेक पात्र शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला नाही. आता राज्य सरकारने पात्र शेतकऱ्यांचे प्रलंबित हप्ते ५ ऑक्टोबर रोजी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारने २०२३ मध्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू केली.या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात. हे पैसे तीन समान हप्त्यात दिले जातात. या योजनेतून शेतकऱ्यांना दररोज सरासरी १७ रुपये ५० पैसे मिळतात. मात्र, नुकत्याच केलेल्या काही बदलानुसार, या योजनेचे लाभ घेण्यासाठी पात्र असण्याचे निकष कडक करण्यात आले आहेत. यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. अंदाजे ५ लाख शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढण्यात आले आहे.

पत्रकार -

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Translate »