Kanda Bajarbhav : दसऱ्याला लासलगाव मार्केटला कांदा आवक, बागलाणला लाल कांदा खरेदीला सुरुवात..बाजारात कांद्याची आवक किती झाली? 

दसऱ्याच्या दिवशी केवळ लासलगाव बाजार समितीमध्ये आज सकाळ सत्रातील कांदा लिलाव सुरु होती. तर जळगाव बाजारात सकाळच्या सुमारास लाल कांद्याची आवक झाली. तर क्विंटलला ४ हजार रुपये दर मिळाला.

दसऱ्यानिमित्त नाशिक जिल्ह्यातील  सर्वच बाजार समितीमध्ये लिलाव बंद होते केवळ लासलगाव मुख्य मार्केट यार्ड वरील कांदा या शेतीमालाचे लिलाव फक्त सकाळ सत्रात सुरु झाले आहे. शनिवारी सकाळी लासलगाव मार्केट यार्डात २५०० क्विंटल उन्हाळ कांद्याची आवक झाली. तर कमीत कमी २०५० रुपये तर सरासरी ४२०० रुपये दर मिळाला.

तर बाजार अहवालानुसार  जळगाव बाजारात लाल कांद्याची आवक झाली. या कांद्याला ४ हजार रुपये दर मिळाला. तर दसऱ्याच्या निमित्ताने नाशिकच्या बागलाण तालुक्यातील कुपखेडा येथे मोसम कृषी खाजगी मार्केटचा शुभारंभ होत झाला. सकाळी दहा वाजेपासून लाल कांद्याची खरेदी सूरू झाली. बागलाण तालुक्यातील नामपूर-नळकस रोडवरील कूपखेडा येथे हे लिलाव पार पडला.

काल रविवार असल्याने काही निवडक बाजार समितीमध्ये कांद्याची 16 हजार 987 क्विंटलचे आवक झाली. आज कांद्याला कमीत कमी 2950 रुपयांपासून ते 04 हजार 500 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला.

काल 13 ऑक्टोबर 2024 रोजी च्या पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार नागपूर बाजारात 22 नाशिक बाजारात 210 तर अहमदनगर बाजारात 4678 क्विंटल ची उन्हाळ कांद्याची आवक झाली. यात लासलगाव निफाड बाजारात 3900 रुपये, अकोले बाजारात 04 हजार 200 रुपये, रामटेक बाजारात 04 हजार 500 रुपये दर मिळाला.

तर धाराशिव बाजारात लाल कांद्याला सरासरी 2950 रुपये तर पुणे बाजारात लोकल कांद्याला 3250 रुपये आणि वाई बाजारात 3800 रुपये दर मिळाला. तर सर्वसाधारण कांद्याला सातारा बाजारात 03 हजार 200 रुपये दर मिळाला.

पत्रकार -

Translate »