आले (अद्रक) पिकांचे लागवड तंत्र
आले (अद्रक)
जमीन : पाण्याचा उत्तम निचरा होणारी, भुसभुशीत, मध्यम जमीन निवडावी.
लागवडीची वेळ : मे- जून
अ) लागवडीची पध्दत : सरी वरंब्याचे वाफ्यामध्ये बेणे रोवून
हेक्टरी बियाणे : १००० – १२०० किलो (बारीक), १४००-१५०० किलो (जाड) पूर्वमशागत : शेतास आडवी उभी नांगरणी केल्यावर ढेकळे फोडून वखरणी करावी. नंतर चांगले कुजलेले शेणखत हेक्टरी ४०-५० गाड्या टाकावे व पुन्हा वखरणी करावी. सुधारित जाती : माहीम, सुप्रिया, रिओडिजानिरो, चायना, व्यानाड, जी ५५-१, सुरभी
लागवड : सरी वरंब्याचे वाफ्यामध्ये २०-२५ ग्रॅम वजनाचे तुकडे करून ३० x २२.५ सें.मी. अंतरावर लावावे.
खत व्यवस्थापन : हेक्टरी ५० किलो नत्र + २५ किलो स्फुरद + २५ किलो पालाश द्यावा यापैकी पूर्ण स्फुरद आणि पूर्ण पालाश लागवडीसोबत तर लावणीनंतर ३० दिवसांनी अर्धा नत्र व राहिलेला अर्धा नत्र त्यानंतर ६० दिवसानी द्यावा. ओलीत दर ८-१० दिवसानी पाण्याच्या पाळ्या द्याव्या. जमिनीचा मगदूर व पिकाच्या गरजेनुसार हा कालावधी कमी जास्त करावा. आंतरमशागत : पीक स्वच्छ व निरोगी राहण्यासाठी २-३ निंदण द्यावे. झाडांना मातीची भर द्यावी. शक्य झाल्याससावली देणारी झाडे (एरंडी) पिकामध्ये लावावीत.
पिकाचा कालावधी : आले हे पीक साधारणपणे २७० दिवसात तयार होते.
काढणी : पिकाची पाने ५० टक्के पेक्षा जास्त पिवळी पडून सुकू लागल्यावर पीक काढणीस तयार झाले असे समजावे. नंतर खोदून पिकाची काढणी करावी. हेक्टरी उत्पादन : १०० ते १५० क्विंटल ओल्या अद्रकाचे उत्पादन मिळते.
धन्यवाद
🙏🙏🙏