Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक  जाहीर ;२० नोव्हेंबरला मतदान तर निकाल २३ नोव्हेंबरला लागणार!

महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबरला संपणार आहे. यापूर्वीच, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंडच्या विधानसभा निवडणुकांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी १५ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीच्या कार्यक्रमात मतदार यादीचे पुनरावलोकन, आचारसंहिता पाळणे आणि निवडणूक पारदर्शकतेसाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या घोषणेदरम्यान निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ. सुखबीर सिंह संधू उपस्थित होते.

राज्यातील या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, कारण महाराष्ट्र हे राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे राज्य असून येथील निवडणूक परिणामांचा राष्ट्रीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यक्रम

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर रोजी संपणार असून, झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ रोजी संपत आहे. याआधी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांच्या निवडणुकांसाठी कार्यक्रम जाहीर केला होता. आयोगाच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी २३ नोव्हेंबरला होईल आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. त्यामुळे आता सर्व राजकीय पक्षांनी आपले दौरे, सभा आणि प्रचाराला अधिक गती दिली आहे.

पत्रकार -

Translate »