राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींना आणि केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना मिळणार दिवाळीचं गिफ्ट ! काय आहे आनंदाची भेट? वाचा सविस्तर..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्राने रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून दिवाळीचा बोनस देण्याची चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना राज्य सरकारकडून 3 हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. तसेच, काही निवडक महिला आणि मुलींना 2500 रुपये मिळणार आहेत. याचा अर्थ असा की अनेक महिलांना दिवाळीच्या आधी 5500 रुपयांचा बोनस मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्राने अनेक पिकांच्या किमान आधारभूत किंमती (एमएसपी) वाढवल्या आहेत, ज्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशभरातील शेतकऱ्यांची दिवाळी आनंददायी होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासोबतच, आणखी एक महत्त्वाचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला असून, रब्बी हंगामातील पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (एमएसपी) वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गहू पिकाच्या दरात प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ, तर मोहरी पिकाच्या दरात 300 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारने 2025-26 या वर्षासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) निश्चित केल्या आहेत. या निर्णयानुसार गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 150 रुपयांची वाढ करून तो 2425 रुपये करण्यात आला आहे. यापूर्वी हा दर 2275 रुपये होता. मोहरीच्या एमएसपीत 300 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे, त्यामुळे आता मोहरीचे दर 5950 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत, जे याआधी 5650 रुपये होते. केंद्र सरकारने हरभऱ्याच्या एमएसपीतही 210 रुपये प्रति क्विंटलने वाढ केली आहे, ज्यामुळे हरभऱ्याचा दर प्रति क्विंटल 5650 रुपये झाला आहे, जो पूर्वी 5440 रुपये होता. मसुरीच्या एमएसपीत प्रति क्विंटल 275 रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्यामुळे मसुरीचे दर 6425 रुपयांवरून 6700 रुपये प्रति क्विंटल झाले आहेत.

पत्रकार -

Translate »