Maharashtra Rain : वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज, मुंबई-ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना दिलाय अलर्ट

पुढील तीन दिवसांसाठी पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या चार-पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. शुक्रवारी दिवसभर पावसाने विश्रांती घेतली नाही. पुढील तीन दिवसांसाठी पुन्हा जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आजही जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागांत विजांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांसाठी ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बुलढाणा जिल्ह्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.हवामान विभागाने आज मुंबईसह ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. यासाठी आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, मागील दोन दिवस ठाण्यात यलो अलर्ट असतानाही पाऊस पडला नव्हता. मात्र, नागरिकांनी सतर्क राहावे, अशी सूचना देण्यात आली आहे, कारण हवामान विभागाच्या अंदाजानुसार पाऊस कोणत्याही क्षणी होऊ शकतो.

वाशिम जिल्ह्यातील चांडस, कळमगव्हानसह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार उपस्थिती दाखवली आहे. या पावसामुळे काही ठिकाणी कापणी केलेल्या सोयाबीनचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, या पावसामुळे जमिनीत ओलावा वाढल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. पावसामुळे वातावरणात गारवा पसरला असून, शेतकऱ्यांसाठी काही प्रमाणात अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.विदर्भात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. मात्र उद्या पावसाचा जोर कमी होऊन उष्णता वाढण्याची शक्यता आहे.

पत्रकार -

Translate »