ST Bus : एसटीत अशोक लेलँडच्या बसांची एंट्री! दिवाळीपर्यंत इतक्या गाड्यांचा होणार समावेश

एसटीने अशोक लेलँडकडून 2430 नवीन बसेस खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी पहिली बस दापोडी येथे पोहोचली आहे. या आधुनिक बसेसमुळे लांब पल्ल्याचा प्रवास आणखीन सुखकर होणार आहे.

एसटीच्या गाड्यांच्या ताफ्यात आता अशोक लेलँडच्या नवीन बसेस दिसू लागल्या आहेत. पहिली अशी बस दापोडी येथे पोहोचली आहे. एकूण 2430 नवीन बसेस एसटीला मिळणार आहेत. दिवाळीपर्यंत 300 बसेस एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होण्याची शक्यता आहे. या आधुनिक आणि आरामदायक बसेसमुळे एसटीचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे.

एक काळ असा होता जेव्हा एसटी महामंडळाकडे 18 हजार बसेसचा विशाल ताफा होता. मात्र, गेल्या काही वर्षांपासून नव्या बसेसच्या खरेदीला ब्रेक लागल्याने जुन्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. सध्या, हा आकडा 16 हजारच्या आसपास स्थिर झाला आहे. नव्या बसेसना 2X2 आसन व्यवस्था आहे आणि त्या डिझेल इंधनावर चालतात.


यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी या बसेस अधिक उपयुक्त ठरतील. याशिवाय, महामंडळ विद्युत आणि एलएनजी इंधनावर चालणाऱ्या बसेसही आणण्याच्या दिशेने प्रयत्नशील आहे. 2023 मध्ये झालेल्या एका बैठकीत, महामंडळाने 5 हजार डिझेल बसेसना एलएनजीवर चालणाऱ्या बसेसात रूपांतरित करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला.

दापोडीत पहिली बस दाखल

दापोडी कार्यशाळेत एसटीच्या नव्या काफल्यातील पहिली अशोक लेलँडची बस दाखल झाली आहे. ही बस दापोडीतच नोंदणीसाठी सज्ज आहे. या बसेसचा आकार मोठा असल्याने, परिवर्तन बसेसप्रमाणे अधिक प्रवासी सहज बसू शकतील. दिवाळीपर्यंत अशा 300 बसेस एसटीला मिळणार असल्याची माहिती आहे. या बसेस एसटीच्या मालकीच्या असल्याने महामंडळाचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे. यंदाच्या गणेशोत्सवात एसटीला पहिल्यांदाच नफा झाला आहे. गेल्या नऊ वर्षांत पहिल्यांदाच, ऑगस्ट 2024 मध्ये एसटीला 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपयांचा नफा झाला आहे.

पत्रकार -

Translate »