गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान

गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे येथे प्रदान

दिघवद वार्ताहर कैलास सोनवणे :चांदवड तालुक्यातील व प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे लिटमन्स फाउंडेशन तर्फे महाराष्ट्र राज्याचे सहकार परिषदेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ विद्या तज्ञ सुप्रीम कोर्ट चे डॉ. सुधाकर आव्हाड व सह आयुक्त अन्न व औषध प्रशासनचे गिरीश हुकरे आणि जेष्ठ कवी व साहित्यिक श्रीकांत देशमुख हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे माजी आमदार उल्हास पवार उपस्थित होत॥ यावेळी आदर्श सेवा पुरस्कार युवा उद्योजक पुरस्कार व आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे येथील पत्रकार भवनात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गणेश निंबाळकर यांना आदर्श सेवा पुरस्कार पुणे लिटमन्स फाउंडेशन तर्फे प्रदान करण्यात आल्यावर चांदवड प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने व कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

पत्रकार -

Translate »