वर्तमानपत्र समाजात टिकविणे काळाची गरज- सदाशिव गांगुर्डे


कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार)- वर्तमानपत्रातुन समस्याचे निराकारण होऊन समाज व्यवस्थेला न्याय मिळतो डिजिटल युगात वर्तमानपत्र टिकविणे काळाची गरज आहे यामुळे वाचन संस्कृतीवरही भर पडते असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक सदाशिव गांगुर्डे यांनी पत्रकार का दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष स्थानावरून उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांना केले .

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती शिवाजी विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब रसाळ पत्रकार सुनील काळे,दिपक निकम ,दशरथ ठोंबरे,सुनील थोरे,राम बोरसे, भारत मेचकूल,उत्तम आवरे,कैलास सोनवणे,देविदास जाधव,सुनील सोनवणे आदी उपस्थित होते. विद्यालयाचे शिक्षक सुनील गांगुर्डे यांनी प्रास्ताविकेतून बाळशास्त्री जांभेकर यांच्या कार्याची ओळख करून दिली. शशिकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील समस्यांवर पत्रकारांनी प्रकाश टाकून प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले. यावेळी पत्रकार सुनील काळे दशरथ ठोंबरे,कैलास सोनवणे आदींनी पत्रकारितेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पत्रकारिते करिअर करण्याच्या संधी सांगितल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष सदाशिव गांगुर्डे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी वर्तमानपत्रांचे महत्त्व प्रतिपादित केले.तसेच शाळेचे शिक्षक किशोर गांगुर्डे यांच्या संकल्पनेतून इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी पत्रकारांना प्रश्न विचारून पत्रकारिते विषयी अधिक माहिती जाणून घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर गांगुर्डे यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम पेंढारी,पर्यवेक्षक इंद्रभान देवरे,अर्जुन गांगुर्डे,संदीप पाटील,प्रभाकर पेंढारी,सुनील चंदनशिव,अमोल ठोंबरे,गणेश गांगुर्डे धनंजय गांगुर्डे,सागर गांगुर्डे,मधुकर गोसावी,साहेबराव घोलप,ओंकार गांगुर्डे,रेणुका कानडे,सुनिता राठोड, हर्षाली भामरे,कलुबाई साबळे,रमा नगराळे, जयश्री पाटील आधी उपस्थित होते.

पत्रकार -

Translate »