जि. प. आदर्श शाळा दिघवद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कैलास सोनवणे (दिघवद पत्रकार): जि. प. आदर्श शाळा दिघवद येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी जि प आदर्श शाळा, दिघवद येथे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.संमेलनाचे उदघाटन सरपंच रावसाहेब गांगुर्डे,व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमर मापारी यांनी केले. प्रसंगी किरण मापारी,राजाराम मापारी, नारायण मापारी,शंकर निखाडे, बबन गाढे,नामदेव मापारी, शिक्षणतज्ज्ञ संदिप पाटील शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य,सोसायटी चेअरमन पोपट गांगुर्डे .शाम माऊली, अण्णा देसाई,माजी सैनिक सुनिल गांगुर्डे, पालकवर्ग आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते,.संमेलनात विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य. पोवाडे, अभंग, शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत, पथनाट्य यांचे सुंदर सादरीकरण केले स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अलका बोरसे, उपशिक्षक प्रकाश बंजारा, उपशिक्षिका संगिता महाले, प्रिया शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले

